Dharavi Slum Sakal
मुंबई

धारावीत कोरोनाचा विळखा घट्ट; दुपटीने रुग्ण वाढले

कोरोनावर नियंत्रण मिळवलेल्या धारावी, दादर व माहीम हे परिसर पुन्हा एकदा कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

कोरोनावर नियंत्रण मिळवलेल्या धारावी, दादर व माहीम हे परिसर पुन्हा एकदा कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत.

मुंबई - कोरोनावर (Corona) नियंत्रण मिळवलेल्या धारावी, (Dharavi) दादर व माहीम हे परिसर पुन्हा एकदा कोरोनाचे हॉटस्पॉट (Corona Hotspot) झाले आहेत. या तिन्ही ठिकाणी रविवारी 274 नवीन रुग्णांची (Patients) नोंद झाल्याने जी उत्तर विभागातील नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे.

धारावीमध्ये गेल्या 24 तासांत 60 नवीन कोरोनाचे नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत. या परिसरातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 179 वर पोहोचली आहे. ही माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. यापाठोपाठ दादर मध्ये 102 आणि माहिममध्ये 112 नवे कोविड रुग्ण सापडले आहेत.

यानुसार धारावीत आतापर्यंत 7,357 एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, दादरमध्ये 10945 आणि माहिममध्ये 11242 एवढे पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

धारावीत दुप्पट वाढ -

धारावीत 2022 च्या 1 जानेवारी या दिवशी 24 रुग्ण सापडले होते ती संख्या आता दुप्पट होऊन 60 वर पोहोचली आहे. याचा अर्थ मुंबईसह इतर वाॅर्डातील रुग्ण संख्याही दुपटीने वाढले आहेत.

गेल्या पाच दिवसांतील रुग्ण वाढ -

29 डिसेंबरपासून धारावीत रुग्णवाढ सुरू झाली आहे. त्या आधी 2 ते 3 असे रुग्ण दररोज सापडत होते, त्यानंतर, 28 डिसेंबर 17 रुग्णांची भर झाली.

29 डिसेंबर 17

30 डिसेंबर 20

31 डिसेंबर 34

1 जानेवारी 24

2 जानेवारी 60

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

IPL 2026: 'तो' ड्रेसिंग रूममधून पळत आला, डेव्हिड मिलरला फलंदाजीला जाण्यास रोखले अन्... DC च्या डग आऊटमधील Video Viral

SCROLL FOR NEXT