BMC-Office 
मुंबई

Coronavirus: मुंबई महापालिकेत आता नागरिकांना 'नो एन्ट्री'!

सकाळ वृत्तसेवा, समीर सुर्वे

मुंबई: मुंबई: सध्या कोरोनाचा कहर राज्यात वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच शुक्रवार रात्र ते सोमवारी सकाळ या कालावधीत वीकेंड लॉकडाउनची घोषणादेखील करण्यात आली आहे. कोरोनाला रोखण्याच्या दृष्टीने प्रत्येक जण आपापले उपाय करत आहेत. त्यातच आता मुंबई महापालिकेनेदेखील मुख्यालयासह इतर सर्व कार्यालयांमध्ये नागरिकांना येण्यास बंदी घातली आहे. महानगर पालिकेच्या मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये नागरिकांना प्रवेश बंद असणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत संबंधित व्यक्तीकडे ४८ तासपूर्वीपर्यंतचा कोविडच्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल असेल तरच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातही नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. त्यातच आता, महानगर पालिकेतही प्रवेश बंदी करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी आणि संबंधित कार्यालयातील कर्मचारी या व्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्रवेश दिला जाऊ नये. तसेच, जास्तीत जास्त बैठका या व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून घ्याव्यात. बाहेरील कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बैठका ऑनलाईन स्वरुपात घ्याव्यात, असे निर्देश आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

महापालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयात टपाल घेऊन येणाऱ्या व्यक्तीलाही कार्यालयात प्रवेश दिला जाऊ नये, यासाठी टपाल स्वीकारण्याची सोय प्रवेशव्दारावर करणे बंधनकारक असणार आहे, असंही स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईत आज ९ हजार नवे रूग्ण

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत आज काहीशी घट झाल्याची पाहायला मिळाली. आज दिवसभरात 9 हजार 857 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. काल मुंबईत सुमारे ११ हजार नवे कोरोनाबाधित आढळले होते. आज त्या तुलनेत या आकड्यात घट पाहायला मिळाली. मुंबईत आज एकूण 21 रूग्णांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. मुंबईत आज आढळलेल्या नव्या रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 62 हजार 302 वर पोहोचला आहे. तर, सक्रिय रुग्णांची संख्या 74 हजार 522 इतकी झाली आहे.

(संपादन - विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोव्याचे मंत्री रवी नाईक यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

Raju Shetti: शेतकऱ्यांना यंदा उच्चांकी दर मिळवून देणार: राजू शेट्टी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दर निर्णायक बैठक, ऊसतोडीची गडबड करू नये

IPS अधिकाऱ्यावर अंत्यसंस्कार होण्याआधी त्यांच्यावरच आरोप करत ASIने स्वत:ला संपवलं; पोलीस दलात खळबळ

Gautam Gambhir: तुमच्या फायद्यासाठी खेळाडूला लक्ष्य करू नका; गौतम गंभीर, हर्षित राणावरून माजी कर्णधार श्रीकांत यांना सुनावले

Latest Marathi News Live Update : सीमाप्रश्‍नावरून पुन्हा वाढला तणाव; महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळकेंवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT