stop corona esakal
मुंबई

मुंबईत 733 नवे रूग्ण तर 732 जणांची कोरोनावर मात

दिवसभरात १८ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू Coronavirus Update in Mumbai 733 new cases 732 corona free 18 deaths

सकाळ वृत्तसेवा

दिवसभरात १८ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई: राज्यातील कोरोना रूग्णांची आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. शहरात दिवसभरात 733 नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,15,879 इतकी झाली. त्यासह, 732 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6,82,678 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत 65,90,371 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. (Coronavirus Update in Mumbai 733 new cases 732 corona free 18 deaths)

मुंबईत आज दिवसभरात 18 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 164 इतका झाला आहे. आज मृत झालेल्यापैकी 11 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 12 पुरुष तर 6 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 4 रुग्णांचे वय 40च्या खाली होते. 5 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 9 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर 0.11 टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 633 दिवसांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 15,798 हजारांवर आला आहे. मुंबईत 21 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 95 इतकी आहे.

धारावीत केवळ 1 नवा रुग्ण

धारावीत आज 1 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 6859 झाली आहे. दादर मध्ये 6 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांचा आकडा 9544 वर पोचला आहे. तर माहीम मध्ये आज 7 नवे रुग्ण सापडले असुन एकूण रुग्ण 9870 झाले आहेत. जी उत्तर मध्ये आज 14 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांचा आकडा 26,273 झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यरात्री ट्रकला धडकल्यानंतर पेटली बस, ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू; २२ जण जखमी

Vijaya Mehta : रंगभूमीचा दीपस्तंभ निमाला! ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

Taliban Airstrike Pakistan : पाकिस्तानमध्ये घुसून तालिबानकडून हवाई हल्ला?; अनेक दहशतवादी मारल्याचा अफगाणकडून दावा, सीमावाद उफाळला

Low Calorie Ragi Thalipeeth: डाजबिटीज फ्रेंडली! कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबरने भरपूर नाचणीचं थालीपीठ; जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT