सीरम व बिल गेट्‌स फाऊंडेशनमध्ये लस निर्मितीसाठी सहकार्य  
मुंबई

खूशखबर: अवघ्या एवढ्या किमतीत काेरोनावर लस; बिल व मेलिंडा गेट्‌स फाऊंडेशनचे सहकार्य 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई,  सामान्य नागरिकालाही परवडेल अशा दरात कोरोनाची लस तयार करण्यासाठी बिल व मेलिंडा गेट्‌स फाऊंडेशन आणि पुण्याची सीरम इन्स्टीट्यूट यांच्यात भागीदारी झाली आहे. त्यानुसार साधारण 225 रुपयांची ही लस वर्षभरात तयार करण्याचा प्रयत्न होणार आहे. 

सीरम इन्स्टीट्यूटतर्फे सध्या कोरोनावरील लशीची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही प्रक्रिया आणखी वेगात व्हावी तसेच लस निर्मिती करण्याची सीरम इन्स्टीट्यूट ची क्षमता वाढावी यासाठी त्यांना फाऊंडेशनतर्फे अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे. 

बिल व मेलिंडा गेट्‌स फाऊंडेशनतर्फे गवी या अन्य लसनिर्मिती संस्थेमार्फत सीरम इन्स्टीट्यूटला 15 कोटी डॉलर देण्यात येणार आहेत. सीरम इन्स्टीट्यूटतर्फे लशीचे किमान दहा कोटी डोस तयार करण्यात येणार असून ते भारत तसेच गवी मार्फत अन्य गरीब देशांमध्ये पाठविले जातील. ही लस पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये येण्याची अपेक्षा आहे. तिची किंमत तीन अमेरिकी डॉलर (सुमारे 225 रुपये) एवढी असेल. गवी मार्फत त्यांच्या योजनेनुसार ही लस 92 देशांना पुरवली जाईल. निर्मितीनंतर भारतातील संबंधित संस्था तसेच जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) मान्यता मिळाल्यावर लागलीच ही लस बाजारात आणली जाईल. आवश्‍यक्ता भासल्यास तिचे जादा डोस देखील तयार करण्यात येतील. 

हे वाचा : पावसाचा कोविड सेंटरला फटका; रुग्णांचे हाल

सीरम इन्स्टीट्यूट ही लसनिर्मिती क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी संस्था आहे. सुरक्षित व खात्रीशीर लशीची निर्मिती व्हावी यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. कोविड 19 विरुद्धचा आपला लढा अधिक मजबूत करण्यासाठी बिल गेट्‌स फाऊंडेशन व गवी यांच्याबरोबर हा करार करण्यात आला आहे, असे सीरम इन्स्टीट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी सांगितले. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाले पाहिजे व त्यासाठी गरीब देशांमध्येदेखील ही लस पोहोचली पाहिजे. या लसीमुळे लाखो लोकांचे प्राण वाचतील, असेही ते म्हणाले. 

भारताची क्षमता सिद्ध 
सीरम इन्स्टीट्यूटने गवी आणि अन्य औषधनिर्मिती कंपन्यांच्या सहकार्याने यापूर्वीही अनेक रोगांवरील लशींची निर्मिती केली आहे. सुरक्षित व हमखास लस तयार करण्याची भारताची क्षमता या करारामुळे अधोरेखित झाली आहे, असे केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरुप यांनी सांगितले. ही भागीदारी म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील भारताचे आणखी एक यश आहे, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च चे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

Pune Traffic: अंगारकी संकष्टीत दगडूशेठ गणपती दर्शनासाठी गर्दी; पुणे मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT