file photo 
मुंबई

आरोग्य खात्याचे टेन्शन वाढले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वरळी कोळीवाडा, दादर, भायखळा धारावी पाठोपाठ आता पूर्व आणि पश्‍चिम उपनागराच्या दाट लोकवस्तीच्या भागात कोरोनाने हातपाय पसरले आहेत. दोन्ही उपनगरात आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आरोग्य खाते त्यामुळे चक्रावून गेले आहे.

हेही वाचा...तुमची कार व्हायरसला 'अस' संपवणार 

पूर्व आणि पश्‍चिम उपनगरात दाटीवाटीच्या वस्त्यांची संख्या मोठी आहे. संसर्ग झालेले रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्याना शोधणे जिकिरीचे होत आहे. आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना रुग्णाचा संपर्क शोधणे कठीण होत आहे. अरुंद गल्ल्या असल्याने आणि नागरिक दाटीवाटीने रहात असल्याने कोरोनाचा फैलाव वाढत आहे. सोशल डिस्टनसिंग या भागात नाही. त्यामुळे कोरोनाचा पसरत असल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे.

चेंबूर येथील पी. एल. लोखंडे मार्ग येथे रविवारी नवे रुग्ण आढळले आहेत. चेंबूर गोवंडी शिवाजी नगर या भागात रुग्ण संख्या 100 पेक्षा अधिक झाली आहे. येथे रुगणांची वाढती संख्या चिंताजनक आहे. धारावीपाठोपाठ वाढलेल्या मोठ्या वस्त्या या भागात आहेत. कुर्ला भागात 115 रुग्ण आढळले आहेत.

घाटकोपरमधील झोपडपट्ट्यात सापडलेले 42 रुग्ण उपचार घेत आहेत. वांद्रे 72, कांदिवली 47 अशी रुग्णसंख्या वाढत चालली आहे. या भागावर दाटीवाटीच्या झोपडपट्ट्या असल्याने तेथे रुग्णांचे संपर्क शोधणे कठीण झाले आहे. तरीही पालिकेची आरोग्य पथके वस्त्या पिंजून काढीत असल्याचे दिसून येत आहे  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

Mumbai News: मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम

Latest Marathi News Live Update : पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी मोर्चा

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

SCROLL FOR NEXT