BMC sakal
मुंबई

मुंबई : महानगरपालिका आता जाहिरातीतून कमाई करणार

वर्षाला 200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे ध्येय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महानगर पालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) आता जाहिरातीतून (advertising) कमाई करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहे.महापालिकेच्या मालमत्तावर जाहिराती करुन उत्पन्न कमविण्यात येणार आहे.यातून वर्षाला 200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे ध्येय महानगर पालिकेचे आहे.

महानगर पालिकेच्या शुल्क वाढीवर मर्यादा आहेत.त्याच बरोबर आता 500 चौरस फुटा पर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द झाल्याने वर्षाला 450 कोटी हून अधिक उत्पन्न कमी होणार आहे.त्याच बरोबर कोविडमुळे अचानक अतिरीक्त खर्च वाढल्याने महानगर पालिकेला पहिल्यांदाच ठेवी वापराव्या लागल्या आहेत.त्याच बरोबर आता कोस्टल रोड सारखे मोठे प्रकल्प सुरु असून खर्चात दरवर्षी वाढ होत आहे.यामुळे महानगर पालिका आता उत्पन्नाचे नवे मार्ग शोधत आहे.त्यात जाहिरातीतून उत्पन्न मिळवण्याचा विचार पुढे आला आहे.यासाठी महानगर पालिका सल्लागार नेमणार असल्याचे सांगण्यात आले.( Latest Mumbai news)

महानगरपालिकेच्या शाळा,रुग्णालये,पालिका कार्यालयाच्या परीसरात जाहीरात करुन महानगर पालिका उत्पन्न मिळणार आहे.त्यासाठी पालिकेने प्रयत्नही सुरु केले आहे.आता पर्यंत पालिका खासगी ठिकाणी होर्डिंग लावण्यासाठी शुल्क वसुल करत होती.त्याच बराेबर सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावण्यासाठीही शुल्क घेतले जात होते.मात्र,त्यातून फारसे उत्पन्न मिळत नव्हते.महानगर पालिकेचे अनेक भुखंड,इमारती मोक्याच्या ठिकाणी आहेत.तेथे जाहीरात करण्याची परवानगी दिल्यास वर्षाला 200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते असा पालिकेचा अंदाज आहे.

जंक्शनचा अभ्यास

महालक्ष्मी रेल्वे स्टेशन परिसर, दादर रेल्वे स्टेशन परिसर, भायखळा रेल्वे स्टेशन परिसर, वांद्रे कलानगर परिसर अशा मोक्याच्या ठिकाणी जेथे पालिकेच्या मालकीच्या जागा आहे, तेथे खाजगी कंपनीला जाहिरात करता येणार आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागवणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.(Mumbai News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT