corporator fraud with old person crime mumbai police
corporator fraud with old person crime mumbai police esakal
मुंबई

Crime News : तोतया नगरसेवकाने ज्येष्ठ नागरिकाला लुटले

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण पश्चिमेतील वायलेनगर परिसरातील बस थांब्याजवळ एका ज्येष्ठ नागरिकाला मी नगरसेवक आहे, मला ओळखल नाही का असे बोलून एका ज्येष्ठ नागरिकाला लुबाडल्याची घटना घडली आहे.

ज्येष्ठ नागरिकाजवळील 46 हजाराचा मुद्देमाल तोतया नगरसेवकाने लुटून नेला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अरविंद बागल (वय 65) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वायलेनगर परिसरात राहणारे अरविंद हे कल्याण स्थानकाकडे जाण्यासाठी चौकातील बस थांब्याजवळ बसची वाट पहात उभे होते. तेवढ्यात दुचाकीवरुन दोन जण तेथे आले. त्यातील एकाने अरविंद यांना मी नगरसेवक राज पाटील आहे मला ओळखले नाही का ?

मी तुम्हाला ओळखतो असे सांगितले. तुम्ही वयस्कर आहात. हातात सोन्याच्या अंगठ्या, गळ्या सोन्याची साखळी वगैरे घालून कधीही फिरू नका. हल्ली चोऱ्या खूप वाढल्या आहेत, असे बोलून तोतया नगरसेवक राज पाटील याने अरविंद यांच्या खिशातील चार हजार रुपये जबरदस्तीने काढले. हातामधील दोन अंगठ्या काढून त्या एका नोटेमध्ये गुंडाळल्या.

त्या अंगठ्या सुरक्षितपणे काकांच्या खिशात ठेवल्या. त्यावेळी दुसऱ्या भामट्याने अरविंद यांना काका राज पाटील हे नगरसेवक आहेत. त्यांच्या समोर कोणीही सोने नाणे घालून फिरत नाही. असे बोलून रोख रक्कम आणि अंगठ्या अरविंद यांच्या खिशात टाकल्याचा भास निर्माण करुन अरविंद यांना बोलण्यात गुंतवून घटनास्थळावरुन पळून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अरविंद यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तोतया नगरसेवकाचा शोध सुरु केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT