corruption bribe case in kdmc retired employee and worker dombivli crime Sakal
मुंबई

Dombivli Crime : डोंबिवलीत केडीएमसीच्या लाचखोर निवृत्त कर्मचाऱ्यासह शिपाई रंगेहाथ...

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्यासह शिपायाला ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्यासह शिपायाला ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीतील सदनिकांना कर आकारणी करण्यासाठी तक्रारदाराकडून 50 हजारांची रक्कम स्वीकारताना या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश माधवराव महाले (40) हा शिपाई असून तो सद्या केडीएमसीच्या ह प्रभागातील कर आकारणी विभागात कार्यरत आहे. तर सूर्यभान नानाजी कर्डक (60) हा सेवानिवृत्त कामगार असून तो ह प्रभागातून सेवानिवृत्त झाला आहे.

या संदर्भात 42 वर्षीय तक्रारदार गृहस्थ पश्चिम डोंबिवलीत राहतात. एका इमारतीतील 36 सदनिकांना कर आकारणी करण्यासाठी केडीएमसीच्या ह प्रभागातील कर आकारणी विभागात अर्ज केला होता.

या विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सूर्यभान कर्डक आणि शिपाई योगेश महाले या दोघांनी कर आकारणी करण्यासाठी प्रत्येक सदनिकेमागे 3 हजार रूपये प्रमाणे 36 सदनिकांचे मिळून 1 लाख 8 हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदार गृहस्थाने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची शहानिशा केली असता त्यात तथ्य आढळून आले.

त्यानंतर पोलिस निरीक्षक विलास मते यांच्या नेतृत्वाखाली ह प्रभागात सापळा रचला. यावेळी सदर रकमेपैकी 50 हजारांची लाच स्वीकारताना सेवानिवृत्त कर्मचारी सूर्यभान कर्डक आणि शिपाई योगेश महाले या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ थेट अथवा 022-20813598/20813591 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT