मुंबई

चौपाटीवर जाण्यासाठी पैसे मोजा ; भाजपचा ठराव

सकाळवृत्तसेवा

भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये तुम्हाला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, मोकळी हवा घेण्यासाठी समुद्र किनारी जायचे असेल तर त्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. शिवसेना आणि कॉंग्रेसच्या नगरसेवकांचा कडवा विरोध डावलून सत्तेत असलेल्या भाजपने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव पालिका महासभेत बहुमताने मंजूर करून घेतला. 

मिरा-भाईंदर महापालिकेकडून आतापर्यंत जेसल पार्क ही एकमात्र चौपाटी विकसित करण्यात आली आहे. शहरातील एकमेव मोकळे स्थान म्हणून येथे मोठ्या संख्येने अबाल-वृद्ध फिरण्यासाठी येतात. मात्र भाजपने देखभाल आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली या चौपाटीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी ठेकेदाराच्या माध्यमातून फूड प्लाझा आणि जाहिरात केंद्र बनविण्यात येणार आहे.
खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर येथे कोणालाही जायचे असल्यास त्यांना प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. या चौपाटीवर अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. याठिकाणी गणेश विसर्जनासह, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. याच चौपाटीवर मृत्यूनंतरचे विधी केले जातात. या सर्वांसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. 

एका बाजूला नागरिकांना मोकळा श्‍वास मिळावा यासाठी मुख्यमंत्री पालिकेला भूखंड देतात; तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या पक्षाचे नगरसेवक मात्र नागरिकांच्या मोकळ्या श्‍वासासाठी पैसे घेण्यासाठी धडपडत आहेत. या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. 

- अनिल सावंत, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, मिरा-भाईंदर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT