Crime sakal
मुंबई

Mumbai Scam : 1000 कोटीच्या घोटाळ्यात जोडप्याला 6 महिन्यांनंतर अटक

ब्लिस कन्सल्टंट्सचे संचालक आशेष मेहता आणि शिवांगी लाड मेहता या घोटाळेबाज दांपत्याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - ब्लिस कन्सल्टंट्सचे संचालक आशेष मेहता आणि शिवांगी लाड मेहता या घोटाळेबाज दांपत्याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींनी 6000 हून अधिक गुंतवणूकदारांची 1000 कोटीची फसवणूक करत घोटाळा केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून घोटाळ्याचा अथक पाठपुरावा केला आहेत. या प्रकरणी माजी आमदार हेगडे हे गुन्हा दाखल करणारे पहिले तक्रारदार होते आणि तेच प्रकरण नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. हेगडे यांच्या नंतर या प्रकरणी 151 तक्रारदारानी पोलीस तक्रारी दाखल केल्या होत्या.

या प्रकरणी तक्रारदारांना परदेशातून कॉल लैंगिक हिंसाचार, जीवे मारण्याचे धमकीचे कॉल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आशेष मेहता यांना टप्प्याटप्प्याने गुंतवणूकदारांचे पैसे फेडतील असे हमीपत्र देण्यास सांगण्यात आले आहे.

आरोपी मेहता व त्याच्या पत्नीवर एमपीआयडी कायदा व इतर आयपीसी अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.आशेष मेहता आणि शिवांगी लाड मेहता देश सोडून पळून जाऊ नयेत यासाठी ब्लिस कंपनीचे फंड गोठवण्यात आले आहेत.

सोबतच त्यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. या प्रकरणी 180 कोटी रुपयांचा मनी ट्रेल देखील तपासात समोर आला आहे. याशिवाय 165 कोटी रुपयांचा निधी आणि मालमत्ता गोठवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT