मुंबई

खोपोलीत 28 दिवसांसाठी क्वारटांईन केलेले जोडपे पळाले; पोलिसांचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा

खोपोली : दोन  दिवसांपूर्वी पुण्याहून खोपोलीतील कमला रेसिडेन्सी भागातील आपल्या सोसायटीमध्ये परतलेल्या पती-पत्नीची प्राथमिक आरोग्य तपासणी केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने त्यांना होम क्वारटांईन केले होते. मात्र हे पती-पत्नी बुधवारी पहाटे सामान घेऊन तेथून पलायन केल्याचे समोर आले आहे. दोघांच्याही हातावर होम कॉरंटाईनचे शिक्के मारण्यात आलेले आहेत.

लॉकडाऊनच्या महिनाभरानतंर हे पती-पत्नी पुण्यावरुन खोपोलीतील आपल्या घरी आले होते. दोन दिवस त्यांचा  सोसायटी आवारात मुक्त सचांर चालू असल्याने संबंधित सोसायटीतील सदस्यांनी नगरपालिका प्रशासनाला कळविले. मंगळवारी खोपोली पोलिस व नगरपालिका अधिकाऱ्यांनी या दोघापती-पत्नीची तपासणी करुन त्यांच्या हातावर शिक्के मारुन त्यांना 28 दिवसांकरीता होम क्वारंटाईन केले. परंतु बुधवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास त्या पती-पत्नीने काही सामान घेऊन घराला कुलुप लावून आपल्या कारने धूम ठोकली असल्याचे समोर आले आहे. 

यातील पत्नी ही शासनाच्या माहिती व प्रसारण विभागात अधिकारी तसेच पती एका खासगी कपंनीत उच्च पदस्थ अधिकारी असल्याचे समजते. असे असतानाही या  सुशिक्षीत जोडप्याने सचांरबंदीचे नियम व कोरोना संबंधित शासनाचे नियम मोडल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरपालिका प्रशासन व खोपोली पोलिसांकडून आता त्यांचा शोध घेतला जात आहे.

The couple, who were quarantined for 28 days,Escaped from KHOPOLI

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेल मिळणार; पण ‘स्टोव्ह’ कुठून आणणार?; अनेक कुटुंबांचा प्रश्न ः एकच सिलिंडर असलेल्या गृहिणींपुढे अडचणींचा भडका

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर ‘ईव्ही हब’ बनणार; अतुल सावे : मराठवाड्याच्या विकासावर परिषदेत मंथन

IPL 2026: RCB घरच्या मैदानात SRH ला भिडणार, पण पहिल्याच सामन्याला हुकमी एक्के मुकणार; जाणून घ्या संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update : रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार

SCROLL FOR NEXT