Aryan khan e sakal
मुंबई

आर्यन खानसह अरबाज, मुनमुनला जामीन मंजूर

अखेर आर्यनची दिवाळी 'मन्नत'वर

स्वाती वेमूल

Aryan Khan Bail: क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अखेर शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यन खानसह Aryan Khan तिघांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने तीन दिवस युक्तीवाद ऐकून घेतला आणि आता संपूर्ण आदेशाची प्रत उद्या (शुक्रवार) मिळेल. आर्यनची उद्या किंवा शनिवारपर्यंत कारागृहातून सुटका होईल, अशी माहिती आर्यनच्या वकिलांनी दिली. आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अनिल सिंग यांच्या सुनावणीनंतर जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने अरबाज मर्चंटसाठी वकील अमित देसाई आणि मुनमुन धमेचाच्या बाजूने वकील काशिफ अली यांचीही बाजू ऐकून घेतली. एनसीबीने आर्यन, अरबाज आणि मुनमुनला ३ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. Aryan Khan Drugs Case

क्रुझवरील आठ जणांकडे ड्रग्ज मिळालं आहे. त्यांचे व्हॉट्सअॅप चॅट्सही मिळाले आहेत. पंचनाम्यातही त्याची नोंद आहे. काही आरोपींकडे व्यापारी प्रमाणातील व वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज आढळले. तसेच हा ११ जणांचा ग्रुप क्रुझवर भेटणार होता. म्हणून ते त्यांनी व्यक्तिगत सेवनासाठी बाळगल्याचं म्हणता येत नाही. एनडीपीएस प्रकरणांमध्ये जामीन हा नियम नसतो. प्रथमदर्शनी खटला असल्यास जामीन नाकारला जाऊ शकतो, असा युक्तिवाद एनसीबीचे वकील अनिल सिंग यांनी इतर केसेसचा संदर्भ देत केला.

आरोपींना अटक करण्यापूर्वी अटकेची कारणं तपास यंत्रणेकडून सांगणं अपेक्षित होतं. मात्र, योग्य कारण न देताच अटक करून केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केल्याचा दावा आर्यनसह तिघांच्या वतीने बुधवारी उच्च न्यायालयात करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT