Mumbai High Court esakal
मुंबई

Mumbai Crime : राजकीय वादातून चुलतभावाची हत्या; पुण्यातील माजी नगरसेवकाच्या मुलाची १० वर्षांनी सुटका

राजकीय वादातून चुलत भावाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या पुण्यातील माजी नगरसेवकाच्या मुलाची मुंबई उच्च उच्च न्यायालयाने सुटका केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राजकीय वादातून चुलत भावाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या पुण्यातील माजी नगरसेवकाच्या मुलाची मुंबई उच्च उच्च न्यायालयाने सुटका केली आहे. तुषार निम्हण असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला १४ एप्रिल २०१३ रोजी अटक केली होती. न्यायालयाने ५० हजाराच्या जात मुचलक्यावर अटी शर्तीसह निम्हण याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.

१२ एप्रिल २०१३ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास प्रतीक निम्हण हा फिर्यादी कीर्ती काळे व इतर मित्रांसोबत पाषाण येथील काळे इलाइट या इमारतीजवळ गप्पा मारत बसला होता. त्या वेळी दुचाकीवरून तुषार निम्हण, चेतन निम्हण, मुन्ना निम्हण तसेच त्यांचे इतर साथीदार तिथे आले. प्रतीकसोबत त्यांची भांडणे झाली. त्यानंतर प्रतीकने तिथून पळ काढल्यानंतर त्याला गाठत त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

याप्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी तुषार सह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी जामीन मिळावा यासाठी तुषार याने ऍड. अभिजित देसाई, ऍड. करण गजरा, ऍड. संचिता सोनटक्के आणि ऍड. विनय सिंह यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शाम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद करताना खंडपीठाला सांगण्यात आले की, घटनास्थळावरून कोणतीही रिव्हॉल्वर हस्तगत करण्यात आलेली नाही. तसेच साक्षीदाराच्या जबानीत तफावत असल्याने अर्जदाराला देण्यात यावा. या प्रकरणातील सह आरोपी दिग्विजय उर्फ मुन्ना हा देखील जामिनावर बाहेर आहे. खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयातील एका प्रकरणाचा दाखला देत अर्जदाराचा जामीन मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pulwama attack: पुलवामा हल्ल्यासाठी ऑनलाईन स्फोटके खरेदी केले; FATF चा धक्कादायक खुलासा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना पोर्टल बंद, नव्याने पात्र महिला लाभापासून वंचित

Latest Maharashtra News Updates : आझाद मैदान मध्ये शिक्षकांचा आंदोलन, रोहित पवारांचा पाठिंबा

Narayangaon Crime : बनावट नवरी मुलीसह सात जणांची टोळी जेरबंद; सहा ते सात अविवाहित तरुणांची केली फसवणूक

Bike Taxi Service Ban: रॅपिडो बाईक टॅक्सी अखेर बंद, सर्वांचे लक्ष सरकारच्या 'ई-टॅक्सी'कडे

SCROLL FOR NEXT