मुंबई

ठाण्यात आणखी एका नगरसेवकाचा कोरोनानं घेतला बळी 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- मंगळवारी मिरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर आज ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचा कोरोनानं निधन झाले आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन या संदर्भातली माहिती दिली आहे. मुकुंद केणी यांच्या मागे पत्नी ज्येष्ठ नगरसेविका, ठाणे मनपा विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, मुलं मंदार केणी, मयूर केणी तसेच सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

केणी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ठाण्यातल्या रुग्णालयात दाखल केलं होतं. 27 मे रोजी ऑन ड्युटी फिल्डवर काम करत असताना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समजलं. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र मंगळवारी रात्री त्यांची अचानक प्रकृती खालावली. त्यात मुकुंद केणी यांची प्राणज्योत मावळली. आव्हाडांनी ट्विट करुन केणी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

मुकुंद केणी हे कळव्यातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. सलग दुस:यांदा त्यांना नगरसेवक पद भुषविले होते. अतिशय शांत, मनमिळावू स्वभाव आणि त्यांच्या जवळ गेलेला एकही माणूस कधीच खाली हात येत नव्हता. सर्वाशी त्यांचे चांगले संबध होते. देशभरात कोरोनाची लागण झाल्यानंतर ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत होते. कळव्यात सुरवातीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत होती. त्यात कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने अनेक गोर गरीब नागरीकांचे हाल सुरु होते. अशातच संपूर्ण केणी कुटुंब या नागरीकांच्या मदतीसाठी मैदानात उतरले होते. पहिल्या दिवसापासून अगदी आतार्पयत त्यांच्याकडून प्रत्येकाला मदतीचा ओघ सुरुच होता. त्यातच एखाद्याची टेस्ट केली जात नसेल, एखाद्याला रुग्णालयात दाखल करुन घेतले जात नसेल तर केणी हे स्वत: रुग्णालयात जात होते. अशातच कळवा रुग्णालयात एकाला दाखल करण्यासाठी ते गेले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना ताप येऊ लागला, तसेच श्वास घेण्यासही त्रस होत होता.

त्यामुळे लागलीच त्यांनी कोरोनाची चाचणी केली. यात त्यांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला, त्यानंतर त्यांना घोडबंदर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु दुस:याच दिवशी त्यांना मुंबईतील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मागील 14 दिवस ते व्हॅटींलेटरवर होते, त्यात त्यांना मधुमेहाचा आणि बीपीचाही त्रास  होता. त्यामुळे उपचाराला प्रतिसाद देत नव्हते, मागील 14 दिवस त्यांचा कोरोनाशी लढा सुरु होता. अखेर मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत माळवली. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबाबरोबरच राष्ट्रवादीचेही मोठे नुकसान झाले आहे. अतिशय मनमिळावी आणि खरा कोरोना योध्दा हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शांतता कराराची घोषणा पण ट्रम्पसमोर इराणच्या ३ मोठ्या अटी, अमेरिका-इराण डीलमध्ये १४ मुद्दे महत्त्वाचे

Fifa World Cup 2026: ब्राझीलला बरोबरीचेच समाधान; मोरोक्कोसमोर पाच वेळच्या विजेत्यांचा कस, व्हिनिसियसच्या गोलने दिलासा

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : उन्हाळी सुटीनंतर राज्यातील ज्ञानमंदिरे आजपासून पुन्हा गजबजणार; चिमुकल्यांना पहिल्या दिवसाची उत्सुकता

Kasba Beed Gold Coins : शिलाहार राजवंशाची उपराजधानी असलेल्या कोल्हापूरच्या 'या' गावात पुन्हा सापडल्या सुवर्णमुद्रा! काय आहे अतिप्राचीन 'बेडा' आणि त्रिशूळाचे रहस्य?

SCROLL FOR NEXT