मुंबई

Corona Vaccination: मुंबईत आजपासून पुन्हा कोरोना लसीकरणास सुरुवात

समीर सुर्वे

मुंबई: कोविन ॲप मधील तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. आजपासून पुन्हा कोविडचे लसीकरण सुरु होणार आहे. मात्र आता आठवड्यातून चार वेळा लसीकरण होणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत लसीकरण होईल. पहिल्या दिवशी महानगर पालिकेने चार हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र प्रत्यक्षात 1 हजार 926 जणांना लस देण्यात आली.

कोविडच्या लसीकरणासाठी बनविण्यात आलेल्या कोविन ॲप्लिकेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आजचे लसीकरण होऊ शकले नाही. ही तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आहे. आजपासून नियमित लसीकरण सुरु होणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आठवड्यातील चार दिवस लसीकरण करण्यात येणार आहे, असे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार, शनिवार असे चार दिवस हे लसीकरण होणार आहे.

पहिल्याच दिवशी ॲप्लिकेशनमधील त्रुटीमुळे चार हजार जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट महापालिकेला साध्य करता आलेले नाही.  मात्र उद्यापासून चार हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

लसीकरणासाठी कोणत्या रुग्णालयात यावे कोणत्या बुथवर जावे याबाबतचे मॅसेज चार हजार जणांना आतापर्यंत पाठविण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत हे लसीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख 25 हजार 517 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 1 लाख 32 हजार 142 आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.
 
दहा केंद्रावर लसीकरण
1452 स्टाफ नर्स
2357 लसीकरण कर्मचारी

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Covid 19 vaccination resume Mumbai today technical glitches Co Win resolved

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

SCROLL FOR NEXT