thane.jpg 
मुंबई

ठाण्यात राडा! महापालिकेच्या मार्शल्सकडून सर्वसामान्यांना मारहाण 

दीनानाथ परब

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रेल्वे स्टेशन्स, सार्वजनिक ठिकाणी मार्शल्सची संख्या वाढवण्यात आली आहे. या मार्शल्सच्या माध्यमातून पालिका विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहे. आतापर्यंत लाखो रुपयांचा दंड अशा कारवाईतून वसूल करण्यात आला आहे. विनामास्क फिरणाऱ्यांना रोखण्याचा, त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा अधिकार मार्शल्सना देण्यात आला आहे. 

पण आता मार्शल्स आणि सर्वसामान्यांमध्ये संघर्षाच्या घटना वाढू लागल्या आहेत. काही वेळा नागरिकांकडून मास्क न घालण्यासाठी काही कारणे दिली जातात. त्यावरुन मार्शल्स आणि नागरिकांमध्ये शाब्दीक संघर्ष होता. काही वेळा हा संघर्ष हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचतो. अशीच घटना ठाण्यामध्ये घडली आहे. ठाण्यात मास्क न घालण्यावरुन झालेल्या वादातून मार्शल्सनी सर्वसामान्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. 

मागच्या महिन्यात जुहू समुद्र किनाऱ्यावर मास्क न घालण्याच्या मुद्यावरुन मार्शल्स आणि पर्यटकांमध्ये हाणामारी झाली होती. मागच्या काही आठवड्यांपासून  मुंबईसह ठाण्यामध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर दररोज हजारच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. प्रशासनाने ठाण्यामध्ये ३१ मार्चपर्यंत अंशत: लॉकडाउन लावला आहे. ठाण्यातही काही हॉटस्पॉटस आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT