former mayor kishori pednekar sakal
मुंबई

Mumbai News : कोविड बॉडी बॅग घोटाळा; माजी महापौर किशोरी पेडणेकरांना आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स

कोविड बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना समन्स बजावले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - कोविड बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना समन्स बजावले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकर याना सोमवारी हजर राहण्यास सांगितल आहे.

दरम्यान किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. 28 ऑगस्टपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आर्थिक गुन्हे शाखेला न्यायालयाने आदेश दिले आहे. कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

आता या प्रकरणात ईडीनेही चौकशी सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची प्रत, तसेच आनुषंगिक कागदपत्रे ईडीच्या अधिकाऱ्यांनी मागविल्याची माहिती मिळत आहे.

टेंडर प्रक्रियेत घोटाळा

मुंबई महापालिकेनत कोरोना काळात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत घोटाळा झाला असून यात किशोरी पेडणेकर यांचा सहभाग असयाचा आरोप करण्यात येत आहे. मुंबईत मृत कोविड रुग्णांच्या मृतदेहासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग 2 हजारांऐवजी 6800 रुपयांना खरेदी केल्याचं आरोप आहे.

हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप केला आहे. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. या प्रकरणी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आणि खरेदी विभागाचे, तत्कालीन उपायुक्त, रमाकांत बिरादर आणि वेदांत इनोटेक लिमिटेड या कंपनीवरही गुन्हा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Security: चारधाम यात्रेच्या सुरक्षेसाठी ‘नभ नेत्र’ ड्रोन; ५ किमी परिसरातील भाविकांवर ठेवणार नजर

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT