covid body bag scam Kishori Pednekar gets relief till Wednesday mumbai high court  sakal
मुंबई

Mumbai News : कोविड बॉडी बॅग घोटाळा: किशोरी पेडणेकराना बुधवारपर्यंत दिलासा

पेडणेकर यांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर सोमवारी न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या एकलपीठासमोर सुनावणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविड रुग्णांसाठी बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर बुधवारपर्यंत कोणतीही जबरदस्ती कारवाई केली जाणार नसल्याचे तोंडी आश्वासन मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारने दिले आहे.

पेडणेकर यांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर सोमवारी न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. पेडणेकर यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

29 ऑगस्ट रोजी सत्र न्यायालयाने पेडणकर यांचा अटकपूर्व जामीन याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर पेडणेकर याना मुंबई उच्च न्यायालयात 2 दिवसासाठी पुढील सुनावणीपर्यंत दिलासा मिळाला आहे.

पेडणेकरांच्या अटक पूर्व जामीनावर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

टेंडर प्रक्रियेत घोटाळा

मुंबई महापालिकेनत कोरोना काळात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत घोटाळा झाला असून यात किशोरी पेडणेकर यांचा सहभाग असयाचा आरोप करण्यात येत आहे.

मुंबईत मृत कोविड रुग्णांच्या मृतदेहासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग 2 हजारांऐवजी 6800 रुपयांना खरेदी केल्याचं आरोप आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप केला आहे.कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या.या प्रकरणी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आणि खरेदी विभागाचे, तत्कालीन उपायुक्त, रमाकांत बिरादर आणि वेदांत इनोटेक लिमिटेड या कंपनीवरही गुन्हा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT