मुंबई

राज्यातील कोव्हिड सेंटर्स भ्रष्ट्राचाराचे कुरण; देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत घणाघात

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - कोरोनाच्या काळात सुरू झालेल्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे.राज्यात आज मोठ्या संख्येन कोरोनाचे आकडे वाढत आहे. राज्यात सुरुवातीपासून कोरोनाशी नाही तर आकडेवारीशी आपली लढाई केली. आकडे कसे लपविता येतील. याचाच प्रयत्न सरकारने केला. सरकारने सुरू केलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये झालेले भ्रष्ट्राचार म्हणचे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याची गंभीर  टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

एका मराठी वृत्त वाहिनीच्या पत्रकाराला अटक करणे चूक असल्याचेही त्यांनी म्हटले, तसेच हिंदी वृत्तवाहिनीच्या संपादकावर अरेरावीची भाषा करण्याच्या आरोपांमुळे हक्कभंग आणण्यात आला, तर हाच नियम दै सामनाला का नाही लावला जात असा सवाल त्यांनी विधानसभेत विचारला. दै सामनातून ज्या प्रकारे पंतप्रधान आणि राज्यपालांबाबत भाषा वापरली जाते त्याचा त्यांनी यानिमित्ताने समाचार घेतला. राज्यात कोरोनासंसर्ग आटोक्यात आणण्यासाठी उभारण्यात आलेले कोव्हिड सेंटर्स भ्रष्ट्राचाराचे कुरण झाले असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला.

----------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: बिहार जलसंधारणासाठी पुढे; महाराष्ट्रात मात्र दुर्लक्ष ;केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सूचक नाराजी

Hardik Pandya Comeback: हार्दिक पांड्या पुन्हा टीम इंडियात कधी परतणार? शुभमन गिलने दिली मोठी अपडेट; नेमकं काय म्हणाला

बापरे! सैफ अली खानने केलं टक्कल? नक्की काय झालं? व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने सांगितलं कारण

Pune News: दिवाळीला घरी जाण्याचं स्वप्न महागलं? खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी दरांनी प्रवासी हैराण, जास्त भाडं मागत असतील तर इथे करा तक्रार!

Sangli District Bank Election : सांगली जिल्हा बँक निवडणुकीत दिग्गजांना धक्का; संजयकाका पाटलांचा विजय; सुमनताई पाटील यांचा एका मताने पराभव

SCROLL FOR NEXT