Covid Scam  
मुंबई

Covid Scam : कथित बॉडी बॅग खरेदी घोटाळ्याप्रकरणी माजी उपायुक्त बिरादार यांना समन्स

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) महापालिकेच्या केंद्रीय खरेदी विभागाचे (CPD) माजी उपायुक्त रमाकांत बिरादार यांना कोविड-19 महामारीच्या काळात बॉडी बॅग खरेदीच्या कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी समन्स बजावले आहे. त्यांना आज EOW समोर चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.

याआधी बॉडीबॅगचे कंत्राट मिळवणाऱ्या कंपनीला आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स समन्स बजावले आहे. या प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मुंबईतील कोविड घोटाळ्याबाबत काही दिवसांपूर्वी ईडीकडून धाडसत्र सुरु करण्यात आले होते. ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या लोकांकडे ईडीने धाड टाकली होती. याप्रकरणी अजूनही चौकशी सुरु आहे. याआधी आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT