Cow stuck in drainage
Cow stuck in drainage sakal media
मुंबई

मुंबई : गायीनेच पायाने झाकण बाजूला केले; अधिकाऱ्यांचा अजब निष्कर्ष

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दादर पश्चिमेकडील कबुतरखान्याजवळील (Kabutar khana) एका ड्रेनेज चेंबरमध्ये गाय पडल्याची घटना आज (ता. २८) घडली होती. तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गाईला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना (fire brigade authority) यश आले. चेंबरवरील झाकण गाईने (cow stuck in drainage) स्वतःच आपल्या पायाने बाजूला सारल्याचा अजब निष्कर्ष घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी चौकशी अहवालात मांडला आहे.

कबुतरखान्याजवळील एका ड्रेनेज चेंबरमध्ये गाय पडल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास गाय चेंबरमध्ये पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाच फूट खोल चेंबरमध्ये अडकलेल्या गाईला बाहेर काढण्यासाठी क्रेन आणण्यात आली होती. तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर गाईला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, पालिकेच्या घनकचरा विभागाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चेंबरचे झाकण बाजूला कसे सरकले, गाय चेंबरमध्ये कशी पडली, याबाबत चौकशी करण्यात आली. गाईने पायाच्या खुराने चेंबरवरील झाकण खोरल्याने ते सरकले आणि त्यानंतर गाय चेंबरमध्ये पडली असा अजब निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. याशिवाय बाजूलाच पदपथ दुरुस्तीचे काम सुरू असून त्यामुळे झाकण सरकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. जी उत्तर विभाग कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन विभागातील सहाय्यक अभियंत्यांनी सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्याकडे हा अहवाल सादर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT