Mumbai Police Accessories Sakal
मुंबई

Mumbai Police: आता दुकानात मिळणार मुंबई पोलिसांची कॅप, शर्ट, स्वेटशर्ट अन् ट्रॅक पॅन्ट

मुंबई पोलिसांच्या विविध वस्तू आता सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत, असं मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले आहे.

सकाळ डिजिटल टीम

लवकरच मुंबई पोलिसांच्या अनेक वस्तू सर्वजण खरेदी करू शकतात. मुंबई पोलिसांची कॅप, शर्ट, स्वेटशर्ट आणि ट्रॅक पॅन्ट अशा विविध वस्तू विविध दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतील. मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी रविवारी ही घोषणा केली. या विविध प्रकारच्या मालाचे फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत.

पोलिस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार मुंबई पोलिस कॅप, टी-शर्ट, स्वेटशर्ट आणि ट्रॅक पॅन्टअसा माल विक्रीसाठी उपलब्ध करून देतील. त्यांच्या फेसबुकवर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये पाण्याच्या बाटल्या, परफ्यूम आणि जर्कींग अशा गोष्टींचाही समावेश आहे. (Mumbai police to launch their merchandise, to be sold at stores)

मुंबई पोलिसांच्या माध्यमातून सुरु केलेल्या "संडे स्ट्री" उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंही त्यांनी सांगितले. संजय पांडे यांनी पुढील रविवारी 3 एप्रिल रोजी जेव्हा "संडे स्ट्रीट" होईल तेव्हा कॅपचे मोफत वाटप करण्याचे आश्वासन दिले आहे.

या टोप्या पोलिसांप्रमाणे नसून त्या नियमित टोप्यांसारख्या असतील. परदेशात अशा प्रकारच्या टोप्या लोकांसाठी उपलब्ध असतात, असे पांडे यांनी स्पष्ट केले.

'संडे स्ट्रीट' उपक्रमाचा एक भाग म्हणून रविवारी सकाळी ६ ते १० या वेळेत मुंबईतील विविध भागांतील सहा रस्ते वाहतुकीसाठी बंद करून ते मुंबईकरांसाठी तणावमुक्त करण्यासाठी विविध उपक्रमांसाठी खुले करण्यात आले.

पांडे यांनी या मालाची छायाचित्रे शेअर केली आहेत. या उत्पादनांची विक्री केल्यानंतर उभारलेला निधी पोलिस वेलफेअरला वापरला जाईल असंही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT