मुंबई

क्रॉफर्डचा मासळी बाजार ऐरोलीला!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महात्मा फुले मंडईत अनेक वर्षे मासेविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या किमान सहाशे मच्छीमार महिलांना ऐरोली नाक्‍यावर जाण्याचा आदेश महापालिकेने दिला असून त्यामुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. महिला विक्रेत्यांना महापालिकेतर्फे नुकत्याच त्यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत; मात्र काहीही झाले तरी मंडईची जागा न सोडण्याचा इशारा मच्छीमार संघटनांनी दिला असून त्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याची तयारीही त्यांनी केली आहे. आम्हाला जवळच्याच परिसरात पर्यायी जागा द्यावी, असे त्यांचे म्हणणे असून हक्काची बाजारपेठ न सोडण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पालिका आणि मासळी विक्रेत्यांच्या वादात आपल्याला ताजे मासे मिळतील का, अशी चिंता लक्षावधी मत्स्यप्रेमींना आतापासूनच सतावू लागली आहे.

महापालिकेने मासळी विक्रेत्यांना नुकत्याच बाजाराच्या स्थलांतराबाबत नोटिसा बजावल्या आहेत. त्यावर आज मच्छीमार संघटनांचे नेते दामोदर तांडेल यांच्या नेतृत्वाखाली विक्रेत्यांनी बाजार समितीच्या सहायक आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. ऐरोली नाक्‍यावर आमचा बाजार स्थलांतरित झाल्यास तिथे विक्रेते येणार नाहीत. आम्हाला तिथे मासळी घेऊन जाणे खूप कठीण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ससून डॉकमधून मासळी ऐरोलीला नेणे व त्यानंतर ती पुन्हा मुंबईच्या बाजारपेठेत आणणे, असे करताना आमचे कंबरडेच मोडेल. आमचा व्यवसाय बुडेल, अशी चिंता त्यांनी बोलून दाखवली.

क्रॉफर्ड मार्केटचा बाजार ऐरोलीला न हलवता आम्हाला भाऊच्या धक्‍क्‍याशेजारील मॅलेट बंदरावर पर्यायी जागा द्यावी; अन्यथा महात्मा फुले मंडईशेजारी बंद असलेल्या कोंबडी मार्केटमध्ये किंवा पार्किंगच्या जागेवर बाजाराला जागा द्यावी, अशी मागणी मच्छीमार संघटनांतर्फे करण्यात आली. फुले मंडई बाजारातून रोज सुमारे पाच ते सहा कोटी रुपयांच्या माशांचा व्यवसाय होतो. त्यातील निम्मे मासे निर्यात होतात. उरलेली मासळी मुंबईतील १०० बाजारांत पाठवली जाते. त्यातील ६० मासळी बाजार महापालिकेचे आहेत. उरलेले ४० मच्छीबाजार मुंबईतील गावठाण विभागात आहेत.

१५ हजार महिलांच्या रोजगारावर गदा
१०० मच्छीमार्केटमध्ये किरकोळ मासेविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या १५ हजार महिलांचा रोजगार बुडेल, असेही आज सांगण्यात आले. फुले मंडईतून मच्छीबाजार हलवण्याबाबत सुनावणी न घेता त्याबाबतचा आदेश देण्यात आला आहे. महापालिकेने आपला अन्यायी निर्णय बदलला नाही, तर त्याविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशाराही दामोदर तांडेल यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT