मुंबई

विनोद कांबळीची 'ऑनलाईन' फसवणूक; १ लाख १४ हजार रुपयांना गंडा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपट्टू विनोद कांबळीची (Former Indian cricketer Vinod Kambli) सायबर चोरट्याकडून फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. विनोद कांबळीच्या खात्यातून तब्बल १ लाख १४ हजार सायबर चोरट्यांनी चोरले आहेत. (online fraud)

३ डिसेंबर रोजी कांबळी याच्या मोबाइलवर एक निनावी फोन आला. फोनवरील व्यक्तीने आपण बँक्तून बोलत असल्याचे सांगितलं. तसेच बँकेची KYC अपडेट नसल्याचे सांगितलं. जर हे KYC अपडेट केले नाहीत तर व्यवहार ठप्प होण्याची भीती या चोरट्यांनी कांबळी यांना घातली. त्यावर कांबळी यांनी विश्वास ठेवल्याने कांबळी अलगद चोरट्यांच्या जाळ्यात अडकले.

चोरट्यांनी कांबळी यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवली. या लिंकवरील अँप डाऊनलोड करून त्यावर आलेला ओटीपी सांगण्यास सांगून कांबळी यांच्या मोबाइलाचा एक्सेस मिळवला. त्यानंतर आरोपींनी टप्याटप्याने कांबळी यांच्या खात्यातून १ लाख १४ हजार चोरले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कांबळी यांनी वांद्रे पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी ७ डिसेंबर रोजी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT