Crime 
मुंबई

श्रीमंत महाराष्ट्र; राज्यातील सर्व खासदार कोट्यधीश

सकाळवृत्तसेवा

सर्व विजयी उमेदवार कोट्यधीश; एकाचे शिक्षण पाचवी, तर एक पीएचडीधारक

मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण 48 खासदारांपैकी भाजपचे 23, शिवसेनेचे 18, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, कॉंग्रेस, "एमआयएम'चा एक व अपक्ष एक असे खासदार विजयी होऊन संसदेत पोचले आहेत. राज्यातील या 48 खासदारांमध्ये 28 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल असून, 15 खासदरांवर गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

ही माहिती विजयी उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केली असून, "महाराष्ट्र इलेक्‍शन वॉट' आणि "असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थांनी या शपथपत्रांचे विश्‍लेषण केले आहे. खासदारांची आर्थिक पार्श्‍वभूमी विचारात घेता सर्व 48 उमेदवार गडगंज असल्याची माहितीही यातून समोर आली आहे. यात सर्वाधिक मालमत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनियुक्त खासदार उदयनराजे यांची आहे. शैक्षणिक गुणवत्तेच एक खासदार केवळ पाचवी शिकलेले, तर एक पीचएडीधारक असल्याचे दिसून आले.

गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या खासदारांची संख्या

28 - फौजदारी गुन्हे

15 - गंभीर गुन्हे (खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा)

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी (पक्षनिहाय)

13 - भाजप

11 - शिवसेना

1 - राष्ट्रवादी कॉंग्रेस

1 - कॉंग्रेस व एमआयएम

गंभीर गुन्हे दाखल (पक्षनिहाय)

6 - भाजप

5 - शिवसेना

1 - राष्ट्रवादी कॉंग्रेस

1 - कॉंग्रेस व एमआयएम

आर्थिक पार्श्‍वभूमी

48 - कोट्यधीश खासदार

23.04 कोटी रु. - सरासरी मालमत्ता

50 कोटींपेक्षा जास्त - पाच खासदार

सर्वांत श्रीमंत उमेदवार (आकडे कोटी रुपयांत)

199 - उदयनराजे भोसले

140 - सुप्रिया सुळे

127 - रणजित नाईक निंबाळकर

102 - श्रीरंग बारणे

62 - सुनील मेंढे

कर्ज अथवा देणी (कोटी रुपयांत)

3.37 - सरासरी देणी

5.54 - भाजप खासदार

1.23 - शिवसेना

56 लाख रु. - राष्ट्रवादी कॉंग्रेस

शैक्षणिक पार्श्‍वभूमी

1 - पाचवी

1 - आठवी

7 - दहावी

8 - बारावी

13 - पदवी

5 - व्यावसायिक पदवी

7 - पदव्युत्तर

1 - पीएचडी

5 - इतर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : गोकुळ अध्यक्ष निवडीचा पेच मिटला! हायकोर्टाच्या सर्किट बेंचचा महायुतीला मोठा दणका, 'या' तारखेला होणार निवडणूक, सतेज पाटलांच्या 'समविचारी'ला दिलासा!

महापालिकेनंतर आता ठाणे जिल्हा न्यायालय बॉम्बने उडवण्याची धमकी! पोलिसांची धावाधाव संपूर्ण कोर्ट रिकामे; परिसरात खळबळ

तुमच्याच आवडीच्या मालिकेला पुरस्कार देऊन टाकायचे ना! 'तारिणी' मालिकेला डावललं; ‘झी मराठीवर प्रेक्षक संतापले, म्हणतात-

Latest Marathi News Live Update : पावसाचा जोर वाढला, शरद पवारांचा बारामतीसह पुणे जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी दौरा स्थगित

५०० मीटर परिसरातील सोसायट्यांना दिलासा, वाहनतळांवर रहिवाशांना ५० टक्के सवलत; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT