Crime Constable arrested in bribe case sell gutkha and tobacco mumbai esakal
मुंबई

Crime News : गुटखा व तंबाखूची विक्री करु देण्यासाठी लाच मागणाऱ्या हवालदाराला अटक

गुटखा व तंबाखू विक्री करण्यासाठी दरमहा आठ हजार रुपये याप्रमाणे दोन महिन्याचे सोळा हजार रुपये मागितले

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : गुटखा व तंबाखूची विक्री करु देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवघर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अमितकुमार पाटील या पोलिस हवालदारासह दोनजणांना अटक केली आहे.

या प्रकरणी लचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार्‍या तक्रारदाराचे दुकान आहे. त्यात तो याआधी गुटखा व तंबाखूची विक्री करत होता. मात्र सध्या त्याने गुटखा विक्री बंद केले होते. असे असताना अमितकुमार पाटील याने त्याच्याकडे गुटखा व तंबाखू विक्री करण्यासाठी दरमहा आठ हजार रुपये याप्रमाणे दोन महिन्याचे सोळा हजार रुपये मागितले होते.

परंतू तक्रारदाराला पाटील याला पैसे द्यायचे नसल्याने त्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार नोंदवली. त्यानंतर या विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता अमितकुमार पाटील याच्या उपस्थितीत संजय यादव या व्यक्तीने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली व अमितकुमार पाटील याने पुढील बोलणी अमित मिश्रा याच्यासोबत करण्यास तक्रारदाराला सांगितले.

त्यानंतर अमित मिश्रा व संजय यादव यांनी लाचेची रक्कम दहा हजार इतकी नक्की केली व ही रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारत असताना अमित मिश्रा याला रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अमितकुमार पाटील यालाही ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP: ना परीक्षा, ना शारीरिक चाचणी; खेळाडूंना शैक्षणिक पात्रतेतही सूट! दरवर्षी निघणार पोलीस उपनिरीक्षकांची पदे

Latur: लातूरकरांना पुन्हा उन्हाचे चटके; तापमान ३८ अंशांवर; औराद शहाजनी चाळिशीच्या उंबरठ्यावर

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या वाटेवर; सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण

Mahabaleshwar ST Bus: महाबळेश्वरमध्ये नव्या एसटी बसची एंट्री; आकर्षक लूकला पसंती, आसनरचनेवर टीका, प्रवाशांत नाराजी

माजी पंतप्रधानांच्या मुलासोबत व्हॉट्सॲपवर सायबर फ्रॉड; 7.8 कोटी रुपये अकाऊंटमधून गायब, अशा परिस्थितीत कसं सुरक्षित राहायचं? पाहा

SCROLL FOR NEXT