Crime esakal
मुंबई

Crime: बायको अडकली लिफ्टमध्ये म्हणुन नवरोबाने सुपरवायझरला झोडला

सकाळ डिजिटल टीम

पत्नी लिफ्टमध्ये अडकल्याचा राग मनात धरून एकाने खारघर सेक्टर-१७ मधील सेलिब्रेशन सोसायटीमध्ये काम करणाऱ्या सुपरवायझरला बेदम मारहाण केल्याची घटना घटना नुकतीच घडली. या मारहाणीत सुपरवायझर जखमी झाला असून खारघर पोलिसांनी शुभम कळसकर (२८) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गणेश केदारनाथ गुप्ता (२७) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

गणेश गुप्ता हा खारघर सेक्टर-१७ मधील सेलिब्रेशन सोसायटीत सुपरवायझर म्हणून कामाला आहे. गणेश सोसायटीत काम करून दिल्ली पोलिस भरतीची तयारी देखील करत आहे.

शुक्रवारी (ता. १०) रात्री शुभम कळसकर हा पत्निसह सेलिब्रेशन सोसायटीत नातेवाईकांकडे गेला होता. रात्री १० वाजण्याच्या सुमारास शुभम इमारतीच्या खाली आल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे त्याची पत्नि व नातेवाईक लिफ्टमध्ये अडकले.

या गोष्टीचा राग आल्यानेने सोसायटीचे काम पाहणारा सुपरवायझर गणेश गुप्ताला शिवीगाळ करून त्याला हाता-बुक्क्याने तसेच त्याच्या डोक्यावर व तोंडावर गाडीच्या चावीने मारहाण केली.

त्यामुळे गणेश जखमी झाला. त्यानंतर जखमी गणेशला सोसायटीच्या व्यवस्थापकांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल कले. उपचार घेतल्यानंतर गणेशने खारघर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ कोटींची रोकड, ६ कोटींचे दागिने अन्...; काँग्रेस आमदाराकडे आढळलं घबाड, जप्त केलेल्या मुद्देमालाचा आकडा वाचून व्हाल थक्क

"माझ्या मुलाला वाचवा मी..." मुलाच्या जन्मावेळेस ढसाढसा रडू लागला गोविंदा; "गर्भलिंग निदान चाचणी.."

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

SCROLL FOR NEXT