Crime News esakal
मुंबई

Crime: जावई दारु पिऊन द्यायचा मुलीला त्रास! वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल

सकाळ वृत्तसेवा

Crime: दारू पिऊन मुलीला तसेच संपूर्ण कुटुंबीयांना सतत त्रास देणाऱ्या जावयाचा सासऱ्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. बदलापूर-मुरबाड रस्त्यावरील मोऱ्याचा पाडा गावात ही घटना घडली असून पोलिसांनी सासरा संतोष नाईकला अटक केली आहे.

बदलापूर मुरबाड रस्त्यावरील मोऱ्याचा पाडा या गावात बारवी नदीवरील पुलाखाली एक मार्च रोजी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी कुळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान योगेश केणे (वय ३८) याचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यामुळे पोलिसांनी घटनेबाबतचा तपास सुरू केला होता. या वे‍ळी योगेश केणेला दारूचे व्यसन असून त्याने २९ फेब्रुवारी रोजी नशेत सासरा संतोष नाईक याला शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली. तसेच याच वादामुळे संतोष नाईकने योगेशला ठोशाबुक्क्याने मारहाण केली होती. या मारहाणीत योगेश बेशुद्ध पडला होता.

त्यानंतर संतोषने योगेशला प्लास्टिकच्या पिशवीत भरून घरापासून साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोऱ्याचा पाडा गावाच्या हद्दीतील बारवी नदीच्या पुलावरून नदीत फेकून दिल्याने योगेशचा मृत्यू झाला होता.

न्यायालयात २६ मार्चला हजेरी

पोलिसांनी या प्रकरणात सासरा संतोष नाईकवर ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तसेच उलटतपासणीत त्यानेच हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सध्या संतोष कुळगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असून २६ मार्चला त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT