Calcutta High Court building where the hearing of the IAS officer’s wife rape case took place esakal
मुंबई

Navi Mumbai: अत्याचारानंतर व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर, ६ वर्षीय चिमुकलीसोबत जे घडलं ते ऐकून सारेच हादरले

Navi Mumbai Crime: पनवेल शहर पोलिसांनी एका १६ वर्षीय मुलाला अटक केली आहे. त्याच्यावर सहा वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

Vrushal Karmarkar

मुली आणि महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना वाढत आहेत. नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या सहा वर्षीय चिमुरडीचे लैंगिक शोषण करून तिचा व्हिडिओ बनवून स्नॅपचॅटवर पोस्ट केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी १६ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या आईने तो व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 27 सप्टेंबर रोजी घडली आहे. आरोपी मुलगा आणि पीडिता शेजारी होते. 27 सप्टेंबर रोजी मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपी मुलाने तिला आपल्या घरी नेले. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केले आणि त्याचा व्हिडिओही बनवला. मुलाने हा व्हिडिओ स्नॅपचॅटवर पोस्ट करून व्हायरल केला. मुलीसोबत घडलेल्या या घटनेची माहिती कुटुंबीयांना नव्हती. यानंतर मुलीच्या आईने स्नॅपचॅटवर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर याची माहिती मिळाली. त्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तिच्या पतीसह पोलिसात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.

या प्रकरणी त्या मुलावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. त्याला कर्जत येथील बाल न्यायालयात हजर केले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, व्हिडिओ आईपर्यंत पोहोचला त्यानंतर तिने तिच्या पतीसह आमच्याकडे येऊन तक्रार दाखल केली. आम्ही मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजर केले आहे. या पुढील तपास आम्ही करत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT