Crime News sakal
मुंबई

Crime News: मुंबई विमातळावर 2 कोटींचे सोने जप्त; परदेशी नागरिक अटकेत

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport mumbai : | या कारवाईत 2 परदेशी महिलांसह 3 आरोपी प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.| 3 accused passengers including 2 foreign women have been arrested in this operation |

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता.12: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 9 आणि 10 एप्रिल या दोन सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत कोट्यवधीचे सोने जप्त केले आहे. या कारवाईत 2 परदेशी महिलांसह 3 आरोपी प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

रुबिना बानो शेख , मेरी मेला व मायला ओर्डोनेझ अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.यातील शेख ही मुंबईतील मालवणी परिसरातील रहिवासी आहे, तर मेरी व मायला दोघीही फिलिपिन्स देशाच्या नागरिक आहेत. त्यांच्याकडून 3.5 किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रिय बाजारपेठेत सोन्याची किंमत 2 कोटी रुपये एवढी आहे. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना या आरोपी महिला रुबिना शेख संदर्भात गुप्त सूचना प्राप्त झाली होती. त्यानुसार आरोपी प्रवासी शेखला मुंबई विमानतळावर विमानातून उतरताच त्यांना रोखण्यात आले.

तसेच तिची तपासणी करण्यात आली. तपासणीत शेखने लपवलेले सोने तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागले तेव्हा तातडीने विमानतळावरून शेखला अटक करण्यात आली. तिच्या चौकशीत 2 परदेशी महिलांनी शौचालयामध्ये सोन्याची भुकटी लपून ठेवल्याची अधिकाऱ्यांना माहिती मिळाली. हे सोने मेरी व मायला यांनी शेखला दिले होते. त्यानंतर त्यांनी शौचालयात सोने लपवले होते. त्यानंतर सापळा रचून इतर दोन परदेशी महीलाना अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT