मुंबई

Crime News: आयडीएफसी बँकेची लाखोंची फसवणूक; 6 विरोधात गुन्ह्याची नोंद

बँकेच्या बीकेसी शाखेची 26 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे | Bank's BKC branch has been defrauded of Rs 26 lakhs

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: बनावट कागदपत्रांच्या आधारे ऑनलाइन पद्धतीने 26 लाख रुपयांचे कर्ज घेऊन आयडीएफसी फर्स्ट बँकेची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. बँकेच्या बीकेसी शाखेची 26 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. (bank crime)

या प्रकरणी बीकेसी पोलिसांकडून अमित कुमार शर्मा , अभिषेक अग्रवाल , रमेश कुमार , वरुण शर्मा , विवेक सिंग आणि दर्शन सिंग या 6 आरोपीविरोधात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या शिवाय फसवणूक करणाऱ्यांनी बँकेकडून होणाऱ्या केवायसी छाननी प्रक्रियेसाठी बोगस कागदेपत्रे दिली होती. सोबतच याच कागदपत्रांचा वापर करून बँक खाती उघडण्यात आली होती. कर्ज घेतलेल्या पैकी एका आरोपीने कर्जाची परतफेड केलेली नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

आयडीएफसी बँकेच्या प्रादेशिक बँक व्यवस्थापक आणि उपाध्यक्ष प्रमोद अमेता यांनी या प्रकरणी मागील महिन्यात 21 मार्च रोजी बीकेसी पोलिसात गुन्ह्याची नोंद केली होती. नोंदवला. दैनंदिन तपासणी करत असता अमेता याना अनेकांनी वैयक्तिक कर्जात अनियमितता केल्याचे आढळून आले, त्यानंतर त्यांनी कर्जाच्या वितरणा बाबत चौकशी सुरू करण्यास सांगितले.

चौकशीत आरोपीं कर्जधारकानी सादर केलेली कागदपत्रे आयकर विभागाकडे असलेल्या कागदपत्रांपेक्षा वेगळी असल्याचे निष्पन्न झाले. सोबतच आरोपी कर्जधारकांचे आधार कार्डशी लिंक केलेल्या पॅन कार्डचे तपशील जुळत नसल्याचे सापडले. अखेर 6 आरोपी कर्जधारकाविरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणी बीकेसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Heavy Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; वरळी, दादर, सायन, लोअर परळसह अनेक भाग जलमय, मध्य रेल्वे उशिराने

Latest Marathi News Live Update : नेपाळ मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांचा मानसरोवर यात्रेला जाण्याचा मार्ग मोकळा

पाकिस्तानच्या ताब्यात किती भारतीय? अधिकृत कैदी याद्यांमधून आकडेवारी समोर... भारतातील तुरुंगांमध्ये किती कैदी?

Cyber Crime : कष्टाची कमाई क्षणात लंपास! मोबाईल ‘ॲक्सेस’ने खाती रिकामी; सायबर चोरट्यांचे पोलिसांपुढे आव्हान

UPTET 2026 परीक्षेत एआय (AI) कॅमेऱ्यांची कमाल! दुसऱ्याच्या जागी परीक्षा देणारे १५ बोगस उमेदवार गजाआड!

SCROLL FOR NEXT