Crime News 
मुंबई

Crime News : इराणी वस्तीतून इराणी ड्रग लेडीला ठोकल्या बेड्या; एमडी ड्रग्जसह चरस हस्तगत

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - गुन्हेगारांची वस्ती म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या इराणी वस्तीतून पोलिसांनी आत्तापर्यंत अनेक आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याच इराणी वस्तीतून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची घटना आता उघडकीस आली आहे.

एमडी ड्रग्स सह चरस विक्री करणाऱ्या एका महिलेला खडकपाडा पोलिसांनी इराणी वस्तीतून अटक केली आहे. सबा सैय्यद असे अटक आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

कल्याण जवळ असलेल्या आंबिवली परिसरातील इराणी वस्तीत एक महिला एम डी ड्रग्जसह चरस विक्री करत असल्याची माहिती कल्याण खडकपाडा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी कल्याण खडकपाडा पोलिसांच्या पथकाने रात्रीच्या सुमारास आंबिवलीतील इराणी वस्तीत छापा टाकला.

यावेळी एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिची झडती घेत चौकशी केली असता तिच्याकडे एमडी ड्रग्स सह चरसचा साठा आढळून आला. सबा सैय्यद असे या महिलेचे नाव असून ती या इराणी वस्तीत राहते. पोलिसांनी तिच्याकडून एम डी ड्रग्जसह चरस हस्तगत केले आहे. सबा हिने हे अंमली पदार्थ कोठून आणले, कोणाला विक्री करायची याचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT