fraud crime mumbai sakal
मुंबई

झटपट श्रीमंत होणे व बिझनेस थाटण्यासाठी त्याने 10 लाख चोरले...

चोवीस तासातच कोलकत्ता येथून रामनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत असतानाच आपणही बिझनेस थाटून झटपट श्रीमंत होऊया...यासाठी त्याने शक्कल लढवित कंत्राटदाराला देण्यात आलेल्या एका धनादेशाचा अपहार करीत 10 लाखाची रक्कम खात्यातून काढून कलकत्ता येथे पसार झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच रामनगर पोलिसांनी कोलकत्ता येथे जाऊन चोविस तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुभोजित बिसवास (वय 31) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 4 लाखाचे सोन्याचे दागिने व 5 लाखाची रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांनी दिली आहे.

डोंबिवलीत राहणारे बांधकाम व्यावसायिक सुभाष पाटील यांच्याकडे आयरे गाव येथे राहणारा सुभोजित हा गेल्या चार वर्षापासून कामाला आहे. 27 मे ला पाटील यांच्या ऑफिस मधून तीन धनादेश एका कंत्राटदारास देण्यासाठी सुभोजित याच्याकडे देण्यात आले होते. कंत्राटदारास दोन धनादेश देत सुभोजितने एक धनादेश स्वतःकडे ठेवला. त्यानंतर त्यावर स्वतःकरीता असे लिहून त्याने बॅंकेतील खात्यातून 10 लाख रुपये काढून कोलकत्ता येथे मूळ गावी निघून गेला. दोन दिवसांनी कंत्राटदाराचा सुभाष यांना एका धनादेश करीता फोन आला असता सुभोजितने एक चेक दिला नसल्याचे सुभाष यांना समजले. त्यांनी ऑफिसमध्ये सुभोजित विषयी चौकशी केली असता तो दोन दिवसांपासून कामावर आला नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यामुळे सुभाश यांनी बॅंक खात्याचे डिटेल्स तपासले असता 10 लाखाची रक्कम काढली गेली असल्याचे निष्पन्न झाले. सुभाष यांनी त्वरीत रामनगर पोलिस ठाणे गाठत 31 मे ला सुभोजित विषयी तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार तपास केला असता तो मुळचा बंगालचा असल्याने मोबाईल लोकेशन तपासले असता ते कोलकत्ता येथे आढळून आले.

तात्काळ सहाय्यक पोलिस निरिक्षक बळवंत भराडे, पोलिस हवालदार विशाल वाघ, शिवाजी राठोड यांचे पथक कोलकत्ता येथे रवाना झाले. परंतू आरोपीचा मोबाईल बंद येत असल्याने त्याचा शोध लागत नव्हता. तांत्रिक तपास करीत त्याचा नविन मोबाईल नंबर पोलिसांनी शोधला. त्या मोबाईल लोकेशननुसार कोलकत्ता येथील हॉटेल व्ह्यू पार्क येथे सापळा रचत आरोपीला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्यातील 4 लाखाचे दागिने बनविल्याचे समजले त्यामुळे त्याच्या मुळगावी जात त्याच्या घरातून 5 लाखाची रोख रक्कम व सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. सोमवारी त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी तसेच बिझनेस करण्यासाठी त्याने ही चोरी केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का? याचा अधिक तपास केला जात असल्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक भराडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT