crime news mumbai Transformer stolen darkness for 3 days in Palghar Tribal Vikramgad sakal
मुंबई

ट्रान्सफार्मर चोरीला; पालघरमधील आदिवासी पाडे ३ दिवसांपासून अंधारात

शेवते भडांगेपाडा व ठाकूर पाड्याला विज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफार्मरवर अज्ञात चोरांनी मुसळधार पावसाचा व अंधाराचा फायदा घेत डल्ला मारला

अमोल सांबरे

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील शेवते भडांगेपाडा व ठाकूर पाड्याला वीज पुरवठा करणारा गावाबाहेर बसवलेला ट्रान्सफार्मर 13 जुलै रोजी रात्री अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याने हे पाडे 3 दिवसा पासून अंधारात आहेत. शेवते भडांगेपाडा व ठाकूर पाड्याला विज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफार्मरवर अज्ञात चोरांनी मुसळधार पावसाचा व अंधाराचा फायदा घेत डल्ला मारला आहे. भडांगेपाडा व ठाकूर पाड्यात 70 ते 75 घरे आहेत. या घरात गेल्या 3 दिवसापासुन विज पुरवठा खंडित झाला आहे.

या बाबत महावितरण पालघर कार्यालयात गावकरी तक्रार घेऊन गेले असता महावितरणच्या विक्रमगड कार्यालयाकडून विक्रमगड पोलीस ठाण्यात ट्रान्सफार्मर चोरीची तक्रार दाखल केल्या नंतर ट्रान्सफार्मर मिळेल असे सांगण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तर तालुक्यात काही दिवसापासुन मोठया प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यात गेल्या 3 दिवसापासुन विज नसल्याने या पाड्यातील ग्रासम्थांचे हाल होत आहेत. या बाबत या गावातील लोकांनी महावितरण कडे तक्रार केली आहे. महावितरणने तातडीने ट्रांन्सफार्मर बसवून दयावा अशी मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT