crime news mumbai two murder Two children commit suicide in Alibag
crime news mumbai two murder Two children commit suicide in Alibag sakal
मुंबई

दोन मुलांची हत्या करून अलिबागमध्ये दोघांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : दोन लहान मुलांची हत्या करून दोन पर्यटकांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना अलिबाग येथे मंगळवारी (ता. १७) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. कुणाल गायकवाड (वय २९) आणि प्रियांका इंगळे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या पुरुष व महिलेचे नाव असून त्यांच्याबरोबर माऊली (वय ५) आणि भक्ती (वय ३) मृतावस्थेत आढळली. दरम्यान, मृत चौघेही गेल्या बुधवारी (ता. ११) अलिबागच्या ‘ब्लॉसम कॉटेज’ येथे पर्यटक म्हणून पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथून आले होते.

विशेष म्हणजे २ मे रोजी दोन व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार शिक्रापूर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. गेल्या आठवडाभरापासून पर्यटक म्हणून आलेल्या चौघांपैकी आज दुपारपर्यंत कुणाचाही आवाज येत नसल्याने पुरूष व महिलेचे शव गळफास घेतलेल्या, तर दोन लहान मुलांचे शव खाटांवर पडलेल्या अवस्थेत होते.

पुणे ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासासाठी मदत घेतली जात आहे. शवविच्छेदन आणि पुढील तपासातून घटनेमागील मूळ कारण स्पष्ट होईल.

- अशोक दुधे,पोलिस अधीक्षक, रायगड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT