crime news Sakinaka rape case accused sentenced to death Dindoshi court mumbai sakal
मुंबई

साकीनाका बलात्कार प्रकरण : नराधमास फाशीची शिक्षा

जुहू घटनेमध्ये दिंडोशी न्यायालयाचा निकाल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणात नराधम आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर दिंडोशी सत्र न्यायालयाने सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. जुहू येथे एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात आरोपी वडिवेल ऊर्फ गुंडप्पा देवेंद्र (वय ३३) याला न्यायालयाने आज (ता. ३) फाशी सुनावली.

जुहू येथील नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि तिची निर्दयीपणे हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला होता. अशा प्रकारची विकृत मानसिकता असलेल्या आरोपीला समाजात राहण्याची मान्यता देता येणार नाही. यापूर्वीही आरोपीने असा गुन्हा केला आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार करणारी व्यक्ती समाजात राहण्यासाठी योग्य नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीच्या शिक्षेत सवलत देण्याची मागणी फेटाळत न्या. एच. सी. शेंडे यांनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.

आरोपीचा दुसऱ्यांदा गुन्हा

आरोपी देवेंद्रची ही दुसरी शिक्षा आहे. यापूर्वी सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात त्याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली होती; मात्र चांगल्या वागणुकीमुळे त्याला सोडण्यात आले होते; परंतु त्याने सुटका झाल्यावर पुन्हा गुन्हा केला. त्यामुळे आरोपीला सोडल्यास समाजाला धोका निर्माण होईल. आरोपीला कायद्याची भीती वाटत नाही. त्यामुळे त्याला फाशी द्यावी, असा युक्तिवाद अभियोग पक्षाच्या वतीने ॲड. वैभव बगाडे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT