Sangli Crime News
Sangli Crime News esakal
मुंबई

Crime News : कांदिवलीत टँकर व्यावसायिकाची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या; कारण...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील कांदिवली येथे रविवारी एका 32 वर्षीय तरुणाची अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली. सदरची घटना कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरात रविवारी 28 मेला सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मृत तरुणाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याची बाब समोर येत आहे या घटनेत गोळी लागल्याने पीडित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.गोळीबार केल्यानंतर मारेकरी तात्काळ घटनास्थळावरून पळून गेला.

दरम्यान मृत तरुण या परिसरात टँकरने पाणी विक्रीचा व्यवसाय करत होता. याच व्यवसायाच्या वर्चस्व वादातून त्याची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. टँकर व्यवसायावर वर्चस्व राखण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे समजते. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस छापेमारी करत आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

गोळीबाराच्या घटनेमुळे कांदिवली लालजी पाडा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे कांदिवली लालजी पाडा परिसरात मागील सहा ते सात महिन्यांतील गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. याआधी 1 ऑक्टोबर 2022 रोजी गोळीबाराची घटना घडली होती.

सात महिन्यात दुसरी घटना

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात कांदिवली पश्चिमेतील लालजी पाडा परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. परिसरात मध्यरात्री अचानक गोळीबार करण्यात आला. तब्बल चार राउंड फायरिंग झाली होती. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता तर अन्य तिघे जखमी झाले होते.मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. बाईकवरुन आलेल्या दोघांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. परस्परांमध्ये असलेल्या वादातून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. यानंतर पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन जणांना गुजरातमधून अटक केली होती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT