crime sakal
मुंबई

Crime News : बिश्नोई गॅंगच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाला धमकी; रामनगर पोलिसांनी दोघांना केली अटक

याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक प्रशांत जाधव यांना तीन दिवसांपूर्वी पैसे परत करण्यासाठी धमकीचे फोन आले होते. धमकीदाराने बिश्नोई गॅंगचा शूटर बोलतोय असे व्यावसायिकाला धमकाविले. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आकाश गिरी (वय 23) व इंद्रजित यादव (वय 30) या दोघांना पोलिसांनी अटक केली. या दोघांचा बिश्नोई गॅंगशी काही संबंध नाही. परंतू इंद्रजित याचे पैसे प्रशांत यांच्याकडे बाकी आहेत. ते पैसे त्यांनी इंद्रजितला परत करावे म्हणून बिश्नोई गॅंग नावाचा वापर करुन या दोघांनी त्यांना धमकी दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

डोंबिवलीतील व्हर्टीकल बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स कपंनीचे मालक बांधकाम व्यावसायिक प्रशांत जाधव यांना 13 ऑक्टोबरला रात्री पावणे 12 च्या सुमारास एक फोन आला. बिश्नोई गॅंगचा शूटर बोलतोय असे सांगत धमकीदाराने इंद्रजीत यादव याचे पैसे दे नाही तर तुझा मर्डर करतो अशी धमकी दिली. याप्रकरणी प्रशातं यांनी त्वरीत रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

प्रशांत यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत तांत्रिक तपासाच्या आधारे आकाश गिरी याचा शोध सुरु केला. पोलिसांनी या दोघांनाही तात्काळ अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता इंद्रजीत यादव हा प्रशांत यांच्याकडे पूर्वी काम करत होता. त्यांच्यात पैशांचा काही व्यवहार झाला होता. त्यातील काही पैसे प्रशांत यांनी इंद्रजीतला दिले होते, तर काही शिल्लक राहीले होते. इंद्रजीत व आकाश गिरी हे एक दिवस बसले असता इंद्रजीत याने ही बाब आकाश याला सांगितली.

तेथेच त्यांनी प्रशांत यांना धमकी देण्याचा विचार करुन फोन व मॅसेज करत स्वतःला बिश्नोई गॅंगचा शूटर असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांचा बिश्नोई गॅंगशी काही संबंध आढळून आला नाही. याचा अधिक तपास पोलिस करत असल्याचे रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदार कल्याणशेट्टींना मिळणार वाढीव पोलिस बंदोबस्त! जीवे मारण्याच्या धमकीनंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाने मागविला अक्कलकोट उत्तर पोलिसांकडून अहवाल, वाचा...

माझी भूमिका : ‘वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल’

१३ ऑगस्ट २०२६ पंचांग! श्रावणमासाला आजपासून सुरुवात; जाणून घ्या शुभ-अशुभ वेळा

आजचे राशिभविष्य - 13 ऑगस्ट 2026

Green Moong Dal Ladoo: साखर-गूळ नाही तरी चव भन्नाट! असे बनवा हिरव्या मूगडाळीचे प्रोटीनयुक्त लाडू

SCROLL FOR NEXT