मुंबई

Mumbai Crime: चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी काढली वर्दी अन् चक्क बनले विटभट्टीचे मजूर

सकाळ डिजिटल टीम

Crime News: फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांना अनेक वेळा विविध शक्कल लढवाव्या लागतात. कधी वेष बदलून राहावे लागते; तर कधी चोराचेच सोंग घेऊन त्यांना रंगेहाथ पकडावे लागते. कधी कधी बनावट ग्राहक बनूनही कारवाई केली जाते. मानपाडा पोलिसांनीही अशीच कामगिरी केली असून घरफोडी करणाऱ्या चोराला पकडण्यासाठी त्यांनी चक्क उत्तर प्रदेशमधील वीटभट्टीवर मजूर म्हणून काम केले.

पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून चोराकडून २२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. राजेश राजभर असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून २१ लाख २६ हजारांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा येथे राहणारे ओमकार भाटकर यांच्या घरी ऑगस्ट महिन्यात घरफोडी झाली होती. रक्षाबंधनासाठी ते गावी गेले असता दिवसाढवळ्या चोराने बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील मौल्यवान दागिने लंपास केले होते. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शोध सुरू केला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील तारमाळे, अविनाश वणवे यांच्या पथकाने तपास सुरू केला. राजभर हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. दुसरीकडे नवी मुंबई, पनवेल येथील पोलिसांचे पथकदेखील राजभरचा शोध घेत होते. गुन्हे शाखेने केलेल्या तपासानुसार राजभर हा अंबरनाथ येथे राहत असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आझमगढ जिल्ह्यात तो आपले अस्तित्व लपवून राहत होता.

मानपाडा पोलिसांनी एक पथक तयार करत ते उत्तर प्रदेश येथे पाठवले. पोलिसांनी राजेशच्या येण्या-जाण्याच्या रोजच्या मार्गाची माहिती काढली. त्या मार्गावर असलेल्या वीटभट्टीवर पोलिसांनी थांबून तेथे पेहराव बदलून ते काम करत होते.

दोन ते तीन दिवस पाळत ठेवल्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी राजभर हा दुचाकीवरून येत असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याला थांबवून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सात गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी २१ लाख २६ हजार रुपये किमतीचे ३४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

पोलिसांनी राजेश राजभर याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्यावर मानपाडा, पनवेल, अर्नाळा, महात्मा फुले, अंबरनाथ, कोळसेवाडी, बदलापूर, शिळ-डायघर, विष्णूनगर, कल्याण तालुका, शिवाजीनगर, अंबरनाथ आदी पोलिस ठाण्यांत तब्बल २२ गुन्हे नोंद असून या गुन्ह्यांची उकल करण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे.

आरोपीने चोरी करून गावी आलिशान घरदेखील बांधले आहे. मुंबई, उपनगरात तो काही दिवस मुक्काम ठोकून बंद घरे फोडून चोरी करून गावी पुन्हा निघून जात असे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT