police station crime sakal
मुंबई

Mumbai : तू मला आवडते...महिलेने नकार देताच गळ्यावर चाकूने वार

डोंबिवलीत धक्कादायक प्रकार

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - तू मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करेन असे त्याने तिला सांगितले. महिलेने त्यास नकार दिल्याने तिच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची घटना डोंबिवली परिसरात घडली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात जिग्नेश जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डोंबिवली पूर्वेतील शांतीनगर येथील जैन मंदिर समोरील रोडवर शुक्रवारी दुपारी दिडच्या सुमारास ही घटना घडली आहे. वाशी येथे राहणारी एक 25 वर्षीय विवाहित महिला डोंबिवलीत आई, बहीण आणि भावाला भेटायला आली होती. वडिलांकडे आली होती. टिळकनगर परिसरात राहणाऱ्या जिग्नेश यांच्यासोबत पूर्वीची मैत्री होती.

शुक्रवारी दुपारी सदर महिला पायी घरी येत असताना जिग्नेश याने तिला रस्त्यावर थांबविले. तु मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करेन, तु माझ्या बरोबर ये असे सांगितले. सदर महिलेने त्यास नकार दिला. या नकाराचा राग आल्याने जिग्नेश याने त्याच्या जवळ असलेल्या धारदार चाकूने महिलेच्या गळ्यावर वार करत तिला गंभीर जखमी केले आहे.

यानंतर जिग्नेश याने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी महिला त्याच अवस्थेत घरी आली. त्यानंतर तिचा भाऊ याने तिला उपचारासाठी डोंबिवली मधील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले.

मात्र महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात सध्या महिलेवर उपचार सुरू आहेत. महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून टिळक नगर पोलीस ठाण्यात जिग्नेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रविण बाकले या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

IPL 2026: Umpire चा दुजाभाव? मुंबई अन् दिल्लीला वेगवेगळा नियम? हार्दिकच्या ग्लव्ह्ज बदलीमुळे होतायेत आरोप

पगार २५ हजार सांगून १५ हजारच देतात, २५० रुपये वाढ देऊन उपकार केल्याचं दाखवतात; कंपन्यांकडून लूट, कर्मचाऱ्यांचा संताप

Oil Supply Explainer: हॉर्मुज सामुद्रधुनी उघडली तरी पेट्रोल-डिझेल, LPG गॅसच संकट कायम! नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT