sameer wankhede-nawab malik google
मुंबई

समीर वानखेडेंच्या तक्रारीवर नवाब मलिकांच्या विरोधात गुन्हा दाखल

महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाच्या मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर त्यांनी हा गुन्हा दाखल केला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबईचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबईतील गोरेगाव पोलिस ठाण्यात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाच्या मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर त्यांनी हा गुन्हा दाखल केला. समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नवाब मलिक यांनी मंत्री असताना समीर वानखेडे यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्र बनवून नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. त्यावेळी चित्रपट स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या क्रुझ ड्रग्ज प्रकरणाची चौकशी समीर वानखेडे करत होते.

समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी रविवारी रात्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध मानहानीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. मुंबईच्या गोरगाव पोलिसांनी आयपीसीच्या कलम 500 आणि 501 तसेच एससी - एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी समीर वानखेने बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप होता. या आरोपाबाबत जात प्रमाणपत्र पडताळणी समिती द्वारे चौकशी करण्यात आली. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने शुक्रवारी 13 ऑगस्टला आदेश जारी करून समीर वानखेडे अनुसूचित जातीच्या श्रेणीत येत असल्याचे सांगत समीर वानखेडे याना दिलासा दिला. वानखेडे हे जन्माने मुस्लिम नव्हते, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT