CCTV Footage Viral Sakal
मुंबई

नणंद भावजयींचा कारनामा! राज्यभरातील 16 सराफांना घातला गंडा; चोरीचा CCTV Footage Viral

ज्वेलर्सला बोलण्यात गुंतवून या महिलांनी हात चलाखीने दुकानांमधील दागिने चोरले.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : ठाण्यातील खारेगाव झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या नणंद भावजयीचा कारनामा डोंबिवली पोलिसांनी उघड केला आहे. सराफांना बोलण्यात गुंतवून या दोघी हातचलाखीने दुकानातील सोन्या चांदीचे दागिने चोरून पसार व्हायच्या. केवळ ठाणे जिल्ह्यात नाही तर राज्यभरातील अनेक सराफांना या दोघींनी गंडा घातला आहे. डोंबिवली पोलिसांनी या दोघींच्या मुसक्या आवळत त्यांना अटक केली आहे. उषाबाई मकाळे व निलाबाई डोकळे अशी अटक आरोपी महिलांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथ परिसरात विनायक ज्वेलर्स दुकान आहे. काही दिवसांपूर्वी या दुकानात दोन अनोळखी महिला आल्या होत्या. तेथील ज्वेलर्सला बोलण्यात गुंतवून या महिलांनी हात चलाखीने दुकानांमधील दागिने चोरले.

कोणाला काही समजण्याच्या आतच या दोन्ही महिला दुकानातून निघून गेल्या. काही वेळाने दुकानदाराच्या ही बाब लक्षात आली, त्याने आजूबाजूला शोध घेतला मात्र या महिला पसार झाल्या होत्या. दुकान मालकाने याबाबत डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

दाखल तक्रारीवरून डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, पोलीस अधिकारी बलवंत भराडे, पोलीस कर्मचारी सचिन भालेराव यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.

दुकानातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे या महिलांची ओळख पटवली. या दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे. उषाबाई मकाळे, निलाबाई डोकळे अशी या दोन्ही महिलांचे नाव असून या दोन्ही नणंद आणि भाऊजयी आहेत. या दोघी मूळच्या औरंगाबादच्या असून खारेगाव परिसरात मैदानालगत झोपडी बांधून तिकडेच राहत होत्या.

या दोघी ज्वेलर्सचे दुकाने फिरून त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दुकानातील दागिने घेऊन पसार व्हायच्या. त्यांचं राहणीमान बघून कोणालाही संशय येत नव्हता. डोंबिवलीतील ज्वेलर्स दुकानामध्ये चोरी करताना त्या सीसीटीव्ही कॅमेरात आढळून आल्या. आणि त्या दोघी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या.

या दोन्ही महिलांविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत. या दोघीने आणखी काही अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याचा संशय पोलिसांना आहे पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा बदली? तुकाराम मुंढेंना पालक सचिव पदावरून हटवले, कुणाची वर्णी?

Madhuri Mahadevi Elephant Hearing : निराशा! ‘माधुरी’ हत्तीणीचा कोल्हापूर प्रवास आणखी लांबणार; आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

Sanjay Gandhi: ज्योतिषाने म्हटलेलं, संजयची जीवनरेषा छोटी आहे; चामुंडेच्या पुजाऱ्यानेही दिला होता इशारा, इंदिरा गांधी घाबरल्या...

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांची बदली, 'या' शहराच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी...

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्ह्याला पुढील चार दिवस ‘येलो’ अलर्ट

SCROLL FOR NEXT