crime update ED charge sheet 350 people cheated Mahadev Deshmukh mbbs scam mumabi esakal
मुंबई

MBBS प्रवेशातून जमवली ६५ कोटींची माया; ईडीकडून आरोपपत्र!

खटाव MBBS प्रवेश घोटाळा; देशमुख, इतरांनी ६५ कोटी गोळा केले; ED चे आरोपपत्र

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मायणी (ता. खटाव) येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष महादेव देशमुख यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने ३५० विद्यार्थ्यांची फसवणूक करत ६५.७ कोटी रुपये गोळा केले. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशात विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली. महादेव देशमुख यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात ईडीने हा आरोप केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेत फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले असल्याचे ईडीने म्हटले आहे.

श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये एमबीबीएसच्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जात होते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचीही परवानगी घेण्यात आली नव्हती. विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यात आले. मात्र, त्यांना प्रवेश देण्यात आले नाहीत किंवा त्यांचे पैसेही परत देण्यात आलेले नाहीत.

ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातील माहितीनुसार दोन विद्यार्थ्यांच्या पालकांनी वैद्यकीय प्रवेशासाठी १५ ते ४५ लाख रुपये दिले होते. इतर विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी किती पैसे दिले, याची माहितीही आरोपपत्रात देण्यात आली आहे. एका महिला पालकाने २०१६ मध्ये तिच्या मुलीच्या प्रवेशासाठी ४५ लाख रुपये दिले होते, त्याची पावतीही देण्यात आली नव्हती. माझ्या मुलीला प्रवेश देण्यात आला नाही आणि पैसेदेखील परत दिले नाहीत, असा आरोप या महिलेने केला आहे. याप्रकरणी २०१९ मध्ये पुणे पोलिसांकडे तक्रार करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, त्यामध्ये यश आले नाही. मात्र, गेल्यावर्षी तक्रार नोंदवली गेल्याची माहिती संबंधित महिलेने दिली आहे.

विद्यार्थ्यांकडून रोख रकमेच्या स्वरूपात पैसे घेण्यात आले आणि ते श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या खात्यात रुग्णालयाची कमाई म्हणून जमा करण्यात आल्याचे ईडीने आरोपपत्रात दाखवले गेले, असे म्हटले आहे. ही रक्कम महादेव देशमुख, मोहम्मद सिद्दिकी आणि इतरांच्या खात्यात वळविण्यात आली. वैद्यकीय उपकरणे खरेदी, कंत्राटदारांच्या कामाची रक्कम देणे आणि इतर कारणे दाखवत ही रक्कम चेकद्वारे काढली गेली आणि वैयक्तिक लाभासाठी, संपत्ती खरेदीसाठी ती वापरली गेली, असा दावाही ईडीने आरोपपत्रात केला आहे.

आंगडिया व्यावसायिकाची मदत

ईडीच्या आरोपपत्रात श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेसाठी हवालाच्या माध्यमातून १५ ते २० कोटी रुपयांचा मिळविल्याचे म्हटले आहे. त्यासाठी एका आंगडिया व्यावसायिकाची मदत घेण्यात आली. त्या व्यावसायिकाला त्यासाठी तीन ते चार लाख रुपये कमिशन देण्यात आले होते, अशी माहिती या आंगडिया व्यावसायिकाच्या मुलाने दिल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : अंबाजोगाई बीड रोडवर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीस्वार जागेवर ठार

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT