crime update mumbai Stolen owner car for angry wife dombivali sakal
मुंबई

रागावलेल्या बायकोला आणण्यासाठी चोरली मालकाची गाडी

बायको परत आली नाही, जेलची हवा खावी लागली

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : माहेरी रुसून गेलेली बायको काही केल्या परतत नव्हती. अखेर तिला आणण्यासाठी त्याने चक्क मालकाची बोलेरो गाडी घेऊन तो पसार झाला. बायको तर आली नाही, परंतू त्याला जेलची हवा मात्र खावी लागली आहे. रतन उर्फ जितू मासरे (वय 43) असे अटक आरोपीचे नाव असून चार महिन्यांपासून विष्णूनगर पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर त्याला नाशिक येऊन अटक करण्यात आली आहे. डोंबिवली एमआयडीसीतील सुदर्शन नगर येथे राहणारे अमिर शेळके या हॉटेल व्यावसायिकाची गाडी रेतीबंदर रोड, मोठागाव येथून 3 जानेवारीला रात्री चोरीस गेली होती.

याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्हाचा तपास सुरु केला असता त्यांचा नोकर देखील तेव्हापासून बेपत्ता असल्याचे समोर आले होते. विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेंद्र पाटणकर, पोलिस शिपाई कुंदन भामरे यांनी शोध घेतला असता महिना भराच्या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव बोलेरो गाडी बेवारस स्थितीत आढळून आली. परंतू नोकर जितू हा आढळून आला नव्हता. पोलिस त्याच्या मागावर असता तो सतत नाशिक, जळगाव, चाळीसगाव असे आपले ठिकाण बदलत होता. अखेर चार महिन्यानंतर नाशिक येथे जितू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक तत्काळ नाशिकला रवाना होत, सापळा रचत जितूला अटक केली आहे.

जितू याने बायकोला आणण्यासाठी मालकाची गाडी चोरी करुन घेऊन गेला. मात्र बायको तरीही परत न आल्याने त्याने गाडी तेथेच सोडून पळ काढला. आपण पकडले जाऊ या भितीने तो सतत चार महिने आपले ठिकाण बदलत होता. परंतू तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी त्याच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाही आहेत. तसेच याचा अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक भालेराव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

Jayakwadi dam drowning incident: जायकवाडी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू; एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू

IPL 2026 Final, RCB vs GT live: शुभमन-साई यांची विकेट अन् वैभव सूर्यवंशीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड... अहमदाबादमध्ये नोंदवला भन्नाट विक्रम

Vat Purnima 2026: अधिक मासामुळे वटपौर्णिमा उशिरा; जाणून घ्या योग्य तारिख, पूजेचा शुभ मुहूर्त आणि संपूर्ण विधी

SCROLL FOR NEXT