Crime esakal
मुंबई

Mumbai Crime : महिलांना अश्लील संदेश पाठवणारा सराईत बदमाश अटकेत

मुंबईतील कुर्ला परिसरात महिलेचा पाठलाग करून तिला अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी एका व्यक्तीला अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील कुर्ला परिसरात महिलेचा पाठलाग करून तिला अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी एका व्यक्तीला अटक केली. 40 वर्षीय आरोपीचे मनोज कुडिया असे नाव असून तो चेंबूरचा रहिवासी आहे. या प्रकरणात मंगळवारी कुर्ला पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली.

आरोपी कुडिया आणि तक्रारदार महीलेचे पूर्वी नातेसंबंध होते. परंतु कालांतराने आरोपीने दुसऱ्या महिलेशी लग्न केले. परिणामी दोघांचे नाते संपुष्टात आल्यामुळे त्या महिलेनेही लग्न केले. त्यानंतर अपघाताने ते एकमेकांच्या संपर्कात आले. तेव्हापासून आरोपी महिलेला त्रास देऊ लागला.

गेल्या सात महिन्यांपासून तो महीलेच्या फोन नंबरवर अश्लील मेसेज पाठवत होता. तक्रारदार महीलेने तिचा फोन नंबरही बदलला पण आरोपीने तिचा नवा नंबर कसातरी मिळवला आणि त्या नंबरवरही मेसेज पाठवायला सुरुवात केली. अखेर महीलेने तिच्या कुटुंबीयांसह कुर्ल्यातील नेहरू नगर पोलिस ठाण्यात धाव घेतली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

कुर्ला पोलिसांनी आरोपीच्या कॉल डेटा रेकॉर्डवरून त्याचा चेंबूर येथील घराचा शोध घेतला. तत्काळ आरोपीच्या घरी पोहोचून त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. त्याने गुन्ह्याची कबुली देताच त्याला अटक करण्यात आली. आरोपीने अशा प्रकारे किती महिलांचा अशाच प्रकारे छळ केला आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT