मुंबई

मगरीच्या हल्ल्यात तरुण जखमी

संजय खांबेटे

म्हसळा : तालुक्‍यातील पांगळोली येथे सावित्री नदीजवळच्या खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या फैजान मयनुद्दीन धनसे (१९) या तरुणावर नुकताच मगरीने हल्ला केल्या. यामध्ये तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सावित्री नदीत म्हसळ्यातील पांगळोली येथे म्हसळ्याबरोबरच मंडणगड तालुक्‍यातील अनेक जण मासेमारी करतात. १३ डिसेंबरला सायंकाळी पांगळोली येथील मच्छीमार फैजान आणि त्याचा मित्र मुझफ्फर धनसे हे दोघे सावित्री नदीजवळच्या खाडीत मच्छीमारी करत असताना फैजानवर मगरीने हल्ला केला. त्याच्या डाव्या पायाचा चावा घेतला असून तो गुडघा निकामी झाला आहे. या तरुणावर मिरज येथे उपचार सुरू आहेत. म्हसळा वन विभागाचे कोंझरी परिमंडळाचे वन अधिकारी बाळकृष्ण गोरनाक यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. वनरक्षक अतुल आहिरे, दिलीप वाधे उपस्थित होते. फैजानचे वडील मैनू यांनी म्हसळा वन विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

म्हसळा खाडीचा भाग निमखाऱ्या पाण्याचा आहे. तो मगरींच्या वास्तव्यासाठी पोषक आहे. काही वर्षांत या परिसरात मगरींची संख्या वाढली आहे. गुरे, लहान वासरे यांवर त्या झडप घालून शिकार करतात. हल्ले टाळण्यासाठी वन विभागाच्या वतीने परिसरात जनजागृती करण्यात येणार आहे. 
- नीलेश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, म्हसळा    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: मीराबाई चानूची स्वप्नपूर्ती! आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले पहिले पदक; २८ वर्षांचा भारताचा दुष्काळ संपवला...

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT