crop insurance 
मुंबई

बँकांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांवर गटांगळ्या खाण्याची वेळ

अच्युत पाटील

बोर्ड (पालघर) : राष्ट्रीयकृत बँकांचा हलगर्जीपणा, कृषी विभागाची उदासिनता आणि वीमा कंपनीच्या लबाडीच्या त्रिवेणी संगमाच्या अशुध्द पाण्यात शेतकऱ्याला मात्र गटांगळ्या खाण्याची वेळ आली आहे.

केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत 2018 च्या खरिप हंगामातील बावीस तर 2016 च्या खरीप हंगामातील चौदा बागायतदार विमा योजनेचे पैसे मिळवण्यासाठी बँक शाखा,कृषी कार्यालय आणि विमा कंपन्या कार्यालय हेलपाटे मारत आहेत.मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. मागील पाच वर्षांपासुन चिकु फळ पिकाला पंतप्रधान हंगामी पीक विमा संरक्षण योजनेत सहभागी करून घेण्यात आले आहे.

1 जुलै ते 30 सप्टेंबर च्या कालावधीत कमाल दहा दिवस 90 टक्के पेक्षा जास्त आद्रता राहिल्यास शंभर टक्के व किमान पाच दिवस राहिल्यास पन्नास टक्के नुकसान भरपाई वीमा कंपनीने द्यावी अशा अटीवर 2018 च्या खरीप हंगामात टाटा (TATA  वीमा कंपनीला जबाबदारी देण्यात आली होती. 30 जूनपूर्वी बागायतदारांनी पाच टक्के रक्कम जमा करुन विम्याचे अर्ज दाखल करावे असे कृषी विभागाकडून सांगण्यात आल्यावरुन डहाणु तालुक्यातील 32 बागायतदारांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या डहाणु शाखेत प्रस्ताव सादर केले होते.

त्यानुसार बागायतदारांच्या खात्यातून 264994 रुपयाची रक्कम विमा कंपनीकडे विम्याचा हप्ता म्हणून वसुल करण्यात आली आहे. चालु खरीप हंगामात आद्रतेचे प्रमाण जास्त प्रमाणात राहिल्याने बागायतदाला विम्याची रक्कम देणे क्रमप्राप्त आहे. त्या नुसार अनेक बागायतदारांना याचा लाभ झाला आहे. मात्र डहाणू येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या हलगर्जीपणामुळे बावीस बागायतदार वीम्याच्या लाभा पासुन वंचित आहेत. आपल्या हक्कचे पैसे मिळावे म्हणून संबधित बागायतदारांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा डहाणू, टाटा पीक विमा कंपनी आणि कृषी विभाग पाच दिवस राहिल्यास पन्नास टक्के नुकसान भरपाई वीमा कंपनीने द्यावी अशा अटीवर 2018 च्या खरीप हंगामात टाटा (TATA  वीमा कंपनीला जबाबदारी देण्यात आली होती. 30 जून पुर्वी बागायतदारांनी पाच टक्के रक्कम जमा करुन विम्याचे अर्ज दाखल करावे असे कृषी विभागाकडून सांगण्यात आल्यावरुन डहाणु तालुक्यातील 32 बागायतदारांनी बँक ऑफ महारष्ट्राच्या डहाणु शाखेत प्रस्ताव सादर केले होते.

त्या नुसार बागायतदारांच्या खात्यातून 264994 रुपयाची रक्कम  विमा कंपनीकडे विम्याचा हप्ता म्हणुन  वसुल करण्यात आली आहे. चालु खरीप हंगामात आद्रतेचे प्रमाण जास्त प्रमाणात राहिल्याने बागायतदाला वीम्याची रक्कम देणे क्रमप्राप्त आहे. त्या नुसार अनेक बागायतदारांना याचा लाभ झाला आहे. मात्र डहाणू येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या हलगर्जीपणा मुळे बावीस बागायतदार वीम्याच्या लाभा पासुन वंचित आहेत. आपल्या हक्कचे पैसे मिळावे म्हणून संबधित बागायतदारांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा डहाणु,टाटा पीक विमा कंपनी आणि कृषी विभाग प्रमुख यांना पत्र व्यवहार केला आहे मात्र समाधानकारक उत्तर मिळत नाही अशी बागायतदारांची तक्रार आहे. किंबहुना या बाबतीत चौकशी केली असता शेकऱ्यांच्या खात्यातुन विम्याचा हप्ता वजा झाला आहे. मात्र बँकेच्या हलगर्जीपणामुळे आवशक कागदपत्र वेळीच उपलब्ध न झाल्याने वीमा रक्कम जमा होत नसल्याची सबब  विमा कंपनी पुढे करीत  आहे असे डहाणु येथील बागायतदार भाऊराव पाटील यांनी सांगितले.

बँक ऑफ महाराष्ट्र डहाणु शाखेत एकुण बत्तीस बागायतदारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. त्या पैकी नव बागायतदारांच्या खात्यात  वीमा संरक्षण रक्कम जमा झाली आहे. उर्वरीत बाविस बागायतदारांचा प्रश्ण सोडविण्या साठी टाटा वीमा कंपनी कडे पत्र व्यवहार केला आहे असे  बँकेचे विभागिय व्यवस्थपक अभय पाटील यांनी लेखी. व्यवस्थापक अभय पाटील यांनी लेखी.स्वरुपात पत्र दिले आहे. या विषयी टाटा ए.आय.जी कंपनीच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्यासठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता ग्राहकसेवा प्रतिनिधी सेवक व्यस्त असल्याची टेप सुमारे दहा मिनिटे ऐकवण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT