मुंबई

श्रमिकांची सीएसएमटी स्थानकावर गर्दी; केंद्र- राज्य समन्वयाचा अभाव

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्रालयावर केलेल्या आरोपानंतर संतप्त झालेले रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मुबलक श्रमिक ट्रेन महाराष्ट्राला दिल्याचा दावा केला आहे. आता पुन्हा 145 गाड्या दिल्यानंतरही महाराष्ट्र सरकारचे अनियोजन असल्याचा आरोपाचे ट्विट वॉर सुरू असतांना, मंगळवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेर हजारो श्रामिकांची गर्दी झाली होती. आपल्या सामानासह मजूर त्याठिकाणी पोहचल्याने सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला होता. 

 रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे मुंबईत रात्री उशिरा स्थलांतरित मजुरांची मुंबईतील दोन स्थानकांवर झुंबड उडालेली पाहायला मिळाली. सीएसएमटी स्टेशनवर सुमारे 10 हजार लक्ष जास्त तर लोकमान्य टिळक टर्मिनसला सुमारे 15 हजार पेक्षा जास्त श्रमिकांनी गर्दी केली होती.  दोन्ही स्थानकां बाहेर मोठा जमाव जमल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. एकतर जमलेले मजूर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

त्यातच श्रमिक आपले सामान घेऊन रेल्वे स्थानकाच्या बाहेर पोहचले होते. यामध्ये लहान मूल, महिला, वयोवृद्ध नागरिक सगळ्यांचा समावेश होता. काहीही करून आता मुंबईत रहायचं नाही, गावाकडे जायचं असल्याचे मजुर यावेळी सांगत होते.  

सीएसएमटी स्टेशनची क्षमता 23 रेल्वे गाड्यांची असताना रेल्वेने 49 गाड्यांचं वेळापत्रक एका दिवशी लावण्यात आले होते. इंजिन नसल्याने प्रवासी भरलेल्या काही गाड्या तीन तासापासून स्टेशनवर उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या.  रेल्वेने आखून दिलेल्या लिस्टप्रमाणे कामगार स्टेशनवर आले. मात्र रेल्वेकडून रॅक उपलब्ध नसल्याचं कारण सांगितलं जात होता. त्यामध्येच तिकिटांचा ही घोळ होत असल्याने रात्रभर प्रवाशांना गाडीची वाट पाहात रात्र रस्त्यावरच काढावी लागल्याचे चित्र सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दिसून आले.
----------------

49 गाड्या ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला अलोर्ट केल्या होत्या. त्यापैकी 16 गाड्या सोडल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सांगितले की याच्या पेक्षा जास्त गाड्या आम्हाला सोडता येत नाही. त्यानंतर ट्विट केले, नंतर दोन वाजता विभागीय व्यवस्थापकाचे काही अधिकारी आले आणि नंतर सकाळ पर्यंत 49 पैकी फक्त 33 गाड्या धावल्या, त्यामुळे एकीकडे रेल्वे मंत्री सांगतात प्रवासी नाही आणि दुसरीकडे रेल्वे स्थानकबाहेरील श्रामिकांची गर्दी दिसत असल्याने नेमकं कोणाचे चुकते हे स्पष्ट होत आहे.

- नवाब मलिक, मंत्री, कौशल्य विकास व उद्योजकता
------------------
श्रमिक ट्रेनसाठी इंजिन वगैरे नव्हते असा कुठलाही प्रकार नाही, रेल्वे प्रशासन 24 तास काम करत आहे. श्रमिकांना त्यांच्या राज्यात सोडण्याची आमची जबाबदारी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन सगळे प्रयत्न करत आहे. 

- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

SCROLL FOR NEXT