पाली : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली.  
मुंबई

बल्लाळेश्‍वराच्या चरणी गर्दी

सकाळ वृत्तसेवा

पाली (वार्ताहर) : महाशिवरात्री, चौथा शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्यांमुळे बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने फुले, पेढे, नारळ आदी व्यावसायिकांचा धंदा तेजीत आहे. तीन दिवसांत लाखोंची उलाढाल झाली. 

शिवरात्रीपासून पालीत भाविकांची गर्दी होऊ लागली. ती रविवारी (ता. २३) पर्यंत कायम आहे. त्यामुळे येथील दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांचा धंदा तेजीत आहे. हॉटेल, खेळण्यांची आणि शोभिवंत वस्तूंची दुकाने, नारळ, हार, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढे विक्रेते जय्यत तयारीत होते. मंदिर परिसरात मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. बल्लाळेश्‍वर मंदिर परिसरात स्थानिक भाज्या घेऊन अनेक विक्रेत्या महिला बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून येथून खरेदी करत होते. त्यामुळे या विक्रेत्यांचा चांगला धंदा झाला.

वाहतूक कोंडीचा त्रास
पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पाली पोलिस व बल्लाळेश्‍वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. 

बल्लाळेश्‍वराच्या भाविकांसाठी दोन सुसज्ज भक्त निवास आहेत. देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंगदेखील आहेत. सुसज्ज स्वच्छतागृह आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.
- ॲड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्ट, पाली

भाविकांची दर्शनासाठी गर्दी आहे; मात्र वाकण-पाली-खोपोली मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होते. हे मार्ग सुस्थितीत झाल्यास भाविकांचा व पर्यटकांचा ओघ आणखी वाढेल.
- प्रसाद बावकर, व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Prices India : मध्य पूर्वेतील तणावाचा तेलांच्या किमतीवर परिणाम ! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पण प्रकाश राज यांचा बॉलिवूडवर सवाल, 'हिंदी कलाकार गप्प का?'

Maharashtra News: अवघ्या दोनशे रुपयांत होणार जमिनींचे पोटहिस्से, मोजणी फीमध्ये सवलत; राज्य भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

Walking Benefits: फक्त 1 किमी चालण्याची सवय लावा! शरीरात होणारे बदल पाहून तुम्हीही चकित व्हाल

अभिनयातून व्यवसायाकडे वळला अभिजित केळकर; ‘प्रत्येक घासात अस्सल चव’ देण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT