मुंबई

दिवाळीनिमित्त बाजारपेठा फुलू लागल्या; कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने उत्साह 

शर्मिला वाळुंज

ठाणे : दिवाळी म्हणजे उत्साहाची, आनंदाची पर्वणी ठरणारा सण. अगदी श्रीमंतांपासून-मोलमजुरी करणाऱ्यांपर्यंत सर्वांच्याच घरात दिवाळीचा उत्साह दिसून येतो. या वर्षी कोरोनाने सर्व सणांवर बंधने आणली तरी दिवाळीच्या तोंडावर कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बाजारपेठा फुलू लागल्या असल्या, तरी सर्वसामान्य ग्राहक अजूनही खरेदीसाठी बाहेर पडलेला नाही.

दिवाळीच्या तोंडावर तरी नागरिक बाहेर पडतील आणि खरेदी करतील, यामुळे लॉकडाऊन काळात ठप्प पडलेला व्यवसाय तेजी धरेल, अशी आशा व्यावसायिकांना आहे. नोकरदार वर्गाचे वेतन सात तारखेनंतर होत असल्याने दोन दिवसांनंतर बाजारपेठा नक्कीच फुलतील, असा सूर विक्रेत्यांकडून लावला जात आहे. 

दिवाळीनिमित्ताने ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील बाजारपेठांचे रुपडे गेल्या दोन दिवसांपासून पालटले आहे. कोरोनाने आलेली मरगळ झटकून सारे नव्या जोमाने कामाला लागले आहेत. व्यावसायिकांचे सारे आर्थिक गणित सण-उत्सव, लग्नसराई या हंगामावर अवलंबून असते. या वर्षी कोरोनामुळे सहा-सात महिन्यांचा हा हंगाम मंदीत गेला. आता संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने तसेच दिवाळी व नंतर लग्नसराई आल्याने व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांचीही काही प्रमाणात बाजारात गर्दी होत आहे. वर्षभर खरेदी केली नाही, तरी दिवाळीला कपडे, घरातील गरजेच्या वस्तूंची खरेदी केली जाते. या वर्षी सर्वसामान्य नोकरदारांच्या हातात वेतन पडलेले नसल्याने अनेकांनी आपली पावले अद्याप बाजाराकडे वळवलेली नाहीत. वेतन झाल्यानंतर येत्या एक-दोन दिवसात बाजारपेठांमध्ये गर्दी होण्याची आशा विक्रेत्यांना आहे. 

दिवाळीनिमित्त तरी ग्राहक बाजारात गर्दी करतील, असे वाटत होते; परंतु मोजकेच ग्राहक दुकानात कपडा खरेदीसाठी येतात. लग्नानिमित्त खरेदीला येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिस्काऊंट ऑफरही आम्ही सुरू केल्या आहेत. 
- ओमकार सैद, कपडा व्यावसायिक, डोंबिवली

दिवाळीसाठी कपडे घ्या, असे मुले सतत तगादा लावत आहेत; परंतु अद्याप वेतन झालेले नाही. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेलो नाही. वेतन होताच मुलांची कपडेखरेदी आणि फराळासाठीचे सामान घेणार आहे. 
- मनोज बोंडाळे, नागरिक 
 

----------------------------
(संपादन : प्रणीत पवार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT